Human On Moon : मनुष्याचे चंद्रावर राहण्याचे(humans to live on Moon) स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करु शकणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.  आर्टेमिस-1 मोहिमेचा(Artemis-1) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.  ओरियन स्पेसक्राफ्ट(Orion Spacecraft ) चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतले आहे. यामुळे शास्त्रांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 


स्पेसक्राफ्टने चंद्राला प्रदक्षिणा घातली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 50 वर्षांनंतर नासाने चंद्राच्या दिशेने मानवी मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमे अंतर्गत नासाने  शक्तिशाली स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेटद्वारे ओरियन स्पेसक्राफ्ट चंद्रावर पाठवले होते. या स्पेसक्राटने 25 दिवसांपेक्षा अधिक काळ चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. या स्पेसक्राफ्टचा वेग पृथ्वीच्या वातावरणापूर्वी ताशी 40 हजार किलोमीटर होता. मात्र, वातावरणात प्रवेश करताच याचा वेग 480 किलोमीटर इतका झाला. पृथ्वीबाहेरील कक्षेत या स्पेसक्राफ्टने 2800 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना केला. हीटशील्ड तपासणीत देखील या स्पेसक्राफ्टने उत्तम कामगिरी केली. 


नासाचं आर्टेमस-1 हे चंद्रयान मोहीम पुर्ण करून रविवारी पृथ्वीवर परतंल. पॅराशूटच्या साहाय्याने चंद्रयान मॅक्सिकोच्या प्रशांत महासागरात कोसळलं.15 नोव्हेंबरला आर्टेमस-1 चंद्राकडे झेपावलं होतं. नासाच्या माहितीनुसार 2012 ते 2025 दरम्यान चंद्रयान मोहिम राबवली जाणारेय...त्यासाठी 7 हजार 434 अब्ज खर्च येणार आहे.


आर्टेमिस-3 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले जाणार


यानंतर आता 2024 मध्ये आर्टेमिस-2 मिशन  आणि  2025 मध्ये आर्टेमिस-3 मिशन चंद्रावर पाठवले जाणार आहे. आर्टेमिस-3 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले जाणार आहे. मानवाला चंद्रावर राहण्याच्या अनुषंगाने आर्टेमिस मोहिम अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावर पाण्याचा शोध घेतला जात आहे. तसेच चंद्रावरील जमीन, तापमान याचा देखील अभ्यास केला जात आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध संशोधनांमध्ये शास्त्रज्ञांना यश आले आहे. 2025 मध्ये होणारे आर्टेमिस-3 मिशन झाल्यास 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाईल असा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. 


आणखी वाचा - बालवीर जाणार चंद्रावर; 3 लाख लोकांमधून झाली देव जोशीची स्पेस टूरसाठी निवड