नवी दिल्ली : स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स'ने Netflix भारतात आपले सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी नवीन प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. नव्या प्लाननुसार, कंपनी नवीन सब्सक्रायबर्सला पहिल्या महिन्यात केवळ ५ रुपयांत सर्व्हिस ऑफर करत आहे. 'नेटफ्लिक्स'ची नवीन ५ रुपयांची ऑफर २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नेटफ्लिक्स'कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या नव्या प्रमोशनल ऑफरमुळे अधिकाधिक लोक Netflix वापरु शकतात. नव्या ऑफरमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत आम्ही पोहचू शकणार असल्याचं 'नेटफ्लिक्स'कडून सांगण्यात आलं आहे. 


नवीन ऑफरनुसार, 'नेटफ्लिक्स'चे नवे यूजर्स कोणताही प्लान घेऊ शकतात. नवे यूजर्स १९९ रुपयांचा किंवा ७९९ रुपयांचा सर्वात मोठा प्लानही ऑफरमधून सिलेक्ट करु शकतात. ऑफरअंतर्गत यूजर्सना पहिल्या महिन्यासाठी केवळ ५ रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर 'नेटफ्लिक्स'च्या नवीन यूजर्सना दुसऱ्या महिन्यापासून, प्लाननुसार संपूर्ण पैसे भरावे लागणार आहेत. 


'रॉयटर्स'ने दिलेल्या माहितीनुसार, 'नेटफ्लिक्स' लॉन्ग टर्म प्लानही ऑफर करत आहे. कंपनी काही यूजर्सना ३, ६ किंवा १२ महिन्याच्या प्लानवर डिस्काऊंटही देतेय. Netflix लॉन्ग टर्म असणाऱ्या प्लानवर ५० टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करतेय. 'नेटफ्लिक्स'कडून भारतात आधी, यूजर्सना पहिल्या महिन्यासाठी मोफत सर्व्हिस ऑफर करण्यात येत होती. मात्र, सध्या कंपनीने ही ऑफर बंद केली आहे. भारतात 'नेटफ्लिक्स'चा १९९ रुपयांचा सर्वात कमी किंमतीचा प्लान आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतात हा प्लान सुरु केला होता.