मुंबई : जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. परिणामी चित्रपटांचे शुटींग, चित्रपटगृह, मालिका यांच्यावर बंदी आली. त्यानंतर अनेकांची पावलं  डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळली. सध्या नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मची मागणी वाढली आहे. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देत आहेत. अशात नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांच्याकडे नेटफ्लिक्स आहे, परंतु ते नेटफ्लिक्सचा वापर करत नाही, अशांना कपंनी एका नोटिफीकेशनच्या माध्यमातून विचारणा करणार आहे. जर युझर्सने नोटिफीकेशकडे दुर्लक्ष केले तर त्या युझर्सचा अकाऊंड सस्पेंड करण्यात येणार आहे. त्यानंतर युझरला पुन्हा नेटफ्लिक्सचा वापर करायचा असेस तर युझरला पुन्हा नवीन प्लॅन घ्यावा लागणार आहे. अशी माहिती नेटफ्लिक्सनं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. 


 नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन हेड एडी वू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या युझरने गेल्या एक वर्षापासून  नेटफ्लिक्सचा वापर केलेला नाही, त्यांना आम्ही याबाबत विचारणा करत आहोत, इनऍक्टिव्ह अकाऊंट हे त्यांच्या युझरबेसच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचंही त्यांनी सांगितले. 


त्याचप्रमाणे जर युझर्सना आपली मेंबरशिप कायम सुरू ठेवायची असल्यास त्यांना तशी माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकांची संख्या कमी होणं ही नेटफ्लिक्ससाठी मोठी बाब नसल्याचं देखील एडी वू  यांनी यावेळी सांगितले.