`पल्सर`नंतर बजाजची आणखीन एक दमदार बाईक `डोमिनर ४००`
बजाजनं आपली सुपर बाईक `डोमिनर ४००`च्या (Bajaj Dominar 400) लॉन्चिंगची तयारी पूर्ण केलीय
मुंबई : नवीन वर्षाचा प्रारंभ होताच बाजारात नवनव्या गाड्या आणि दुकाची वाहनं लॉन्च होताना दिसत आहेत. त्यामुळे ऑटो मार्केट तेजीत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. मारुती सुझुकीची नवी वॅगन आर, टाटाची एसयूव्ही हॅरियर आणि निसानची किक्स लॉन्च झाल्यानंतर आता नव्या टू-व्हिलर रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झाल्यात. बजाजनं आपली सुपर बाईक 'डोमिनर ४००'च्या (Bajaj Dominar 400) लॉन्चिंगची तयारी पूर्ण केलीय. फेब्रुवारी महिन्यात ही बाईक लॉन्च केली जाईल. बजाजच्या पल्सरनंतर ही आणखीन एक दमदार बाईक बाजारात उपलब्ध असेल. कंपनीकडून डॉमिनरसाठी बुकिंग सुरू करण्यात आलीय.
कंपनी डोमिनरसोबत नव्या 'एव्हेंजर'लाही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दोन्हीही बाईक BS-4 तंत्रज्ञानासोबत सादर केल्या जातील. यामध्ये ABS (एन्टी ब्रेकिंग सिस्टम) फिचर्सही आहेत. डोमिनर ही बजाजच्या सर्वात दमदार आणि महागड्या बाईकपैंकी एक असेल.
डोमिनर ४०० या बाईकची किंमत दीड लाखांपासून १.६५ लाख रुपयांपर्यंत निर्धारित करण्यात आलीय. एन्टी ब्रेकिंग सिस्टमशिवाय असलेल्या बाईकची किंमत १.४९ लाख रुपये असेल. तर एबीए सिस्टमसहीत बाईकची एक्स शोरुम किंमत १.६३ लाख रुपये असेल. सध्या या गाड्यांच्या बुकिंगसाठी काही डिस्काऊंटही ऑफर करण्यात येतोय.
डोमिनर ४०० चे फिचर्स
डोमिनर ४०० मध्ये ३७३ सीसी लिक्विड-कूल्ड फ्युएल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आलंय. सिंगल सिलिंडर इंजिन ३५ bhp पॉवर आणि ३५ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. डोमिनरमध्ये स्लिपर क्लच आणि स्टॅडर्ड फिटमेंटसोबत ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलाय. डोमिनर १४८ किलोमीटर प्रतितास वेगानं धावू शकते. मोटारसायकलमध्ये ट्विन पोर्ट एक्झॉस्ट सिस्टमही मिळेल त्यामुळे एक थ्रोट साऊंडही मिळेल.
डोमिनरचा शानदार लूक
नवी डोमिनर ४०० मध्ये आकर्षक ग्राफिक्स, रंगासहीत फंकी आणि स्पोर्ट लूक देण्यात आलाय. याच्या इंजिनमध्ये डबल ओव्हरहेड कॅम लेआऊट देण्यात आलाय. बाईकमध्ये ३२० एमएमचा फ्रंट डिस्क ब्रेक आणि २३० एमएमचा रिअर डिस्क ब्रेक देण्यात आलाय. सुरक्षेसाठी एन्टी ड्युएल ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलाय. नव्या डोमिनरची किंमत सध्याच्या बाईकहून १० हजार रुपयांपर्यंत जास्त असेल.