Apple iPhone 15 Price Leack: आयफोनच्या नव्या सीरिजबाबत लाँचिंगपूर्वीच जोरदार चर्चा असते. सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवी सीरिज लाँच होत असते. नुकतीच आयफोन 14 सीरिज लाँच झाली असून आयफोन 13 सारखा दिसत आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींनी नव्या सीरिजबाबत नाराजी व्यक्त केली होती. असं असताना आता आयफोन 15 बाबत चर्चा रंगू लागली आहे. लीक्स माध्यमातून अनेक फीचर्स समोर आले आहेत. काही टिपस्टर्सनं नव्या सीरिजबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. आयफोन 15 अल्ट्रा लाँच होणार असून Pro Max व्हेरियंटची जागा घेईल. एका लीकमध्ये आयफोन 15 अल्ट्राच्या किमतीबाबत खुलासा करण्यात आला आहे. आयफोन 15 अल्ट्रा सीरिजमधील टॉप एंड फोन असेल.  लीक्सच्या माहितीनुसार आयफोन 15 अल्ट्रा टायटेनियमपासून बनवला जाईल. तसेच दोन सेल्फी कॅमेरा असू शकतात. या व्यतिरिक्त युएसबी टाईप सी पोर्ट असू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीक्सनुसार आयफोन 15 अल्ट्रा हा आयफोन 14 प्रो मॅक्सच्या तुलनेत 200 डॉलर्सनी महाग असेल. हा कंपनीचा सर्वात महाग फोन असेल. यामुळे मोबाईलप्रेमींना जास्त किंमत चुकवावी लागेल. लीकस्टर LeaksApplePro ने ट्वीट केलेल्या माहितीनुसार, "आयफोन 15 अल्ट्रा बनवण्यासाठी आयफोन 14 प्रो मॅक्सच्या तुलनेत जास्त खर्च येईल. त्यामुळे याची किंमत जास्त असेल."


बातमी वाचा- iPhone 14 शी सॅमसंगचा हा Smartphone करणार स्पर्धा, किंमत पण परवडणारी


फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, LeaksApplePro ने आयफोन 15 अल्ट्राच्या किंमतीबद्दल सांगितले आहे. आयफोन 15 अल्ट्राची सुरुवातीची किंमत $1299 (रु. 1,07,142) असू शकते. खरंच इतकी किंमत असेल तर अॅपलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा फोन असेल. iPhone 15 Ultra च्या 1TB व्हेरिएंटची किंमत $1799 (रु. 1,48,383) पर्यंत असू शकते. ही किंमत यूएसमधील असून भारतात त्याची किंमत जास्त असेल.