नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणजे मारुती सुझुकी. ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना अत्याधुनिक आणि सोयीयुक्त गाड्या कशा देता येतील हाच विचार ऑटोमोबाईल कंपनीचा असतो. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेक जणांचा ओढा गाडी घेण्याकडे असतो. जर तुम्ही गाडी घेण्याच्या विचारात असाल तर, एकदा या गाडीची चाचणी घ्याच. मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री झालेल्या वॅगन आर गाडीचे येत्या 23 जानेवारीला नव्या रुपात अनावरण होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही नवी गाडी अत्याधुनिक आहे. सोबतच या गाडीत नव्या सुविधा आहेत. या गाडीचे नवे रुप अगदी वेगळे आहे. आधीच्या वॅगन आरच्या तुलनेत नव्या गाडीत अनेक बदल केले आहेत. नवी गाडी जुन्या गाडीच्या तुलनेत आकाराने मोठी आहे. नव्या गाडीची चाचपणी भारतात सुरु आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील बाजारात येणारी 'वॅगन आर' ही तिसऱ्या पिढीतील गाडी आहे. या गाडीची विक्री जपानमध्ये होत आहे. भारतात सद्यस्थितीत ज्या वॅगनआर गाड्या आहेत, त्या दुसऱ्या पिढीतील आहेत.


BS6 नॉर्म्स इंजिन


२०२० सालापासून भारतात BS6चे नियम लागू होत आहेत. कमीत कमी प्रदूषणासाठी हे निकष लागू होतात. नव्या स्वरुपातील वॅगन आरमध्ये या इंजिन प्रणालीचा वापर केलेला आहे. यामुळे वायू प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे. BS6 इंजिन ही प्रणाली जगभरात वापरली जाते. या इंजिनप्रणालीचा आपल्या गाड्यांमध्ये वापर केल्यानंतरच गाड्या विक्रीस उपलब्ध केल्या जाणार आहेत. पण याबद्दल कोणतेही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.


इंजिन आणि किंमत


वॅगनआरची ही नवी गाडी 5 आसनी आहे. या गाडीचे इंजिन उच्च श्रेणीतील असून त्याची क्षमता १.२ लीटरची आहे. या इंजिनाचा वापर याआधी स्विफ्ट, डिझायर आणि बलेनो या गाड्यांमध्ये केला आहे. हे इंजिन ८२  ब्रेक हॉर्स पावर (बीएचपी) इतकी उर्जा निर्माण करते. तसेच ११३ न्यूटन मीटर इतके टॉर्क निर्माण केले जाते. यामुळे 'वॅगन आर' या श्रेणीतील सर्वात ताकदवान गाडी होईल. कंपनीकडून या गाडीत सीएनजी आणि एलपीजी अशा दोन इंधनांचा पर्याय देण्यात येऊ शकतो. येत्या नववर्षात (२०१९) लॉन्च होणाऱ्या गाडीची अंदाजित किंमत साडेचार ते साडेपाच लाखांच्या दरम्यान असेल.


स्पर्धा


वॅगनआरच्या या नव्या श्रेणीतील गाडीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढणार आहे. या नव्या गाडीची स्पर्धा ही टाटा मोटर्सच्या टियागो आणि ह्युंडाईच्या नव्या सेंट्रो गाडीशी असणार आहे.