WhatsApp युजर्ससाठी कंपनीची नवी सुविधा
What`s App धारकांसाठी नवीन फीचर
मुंबई : What's App धारकांसाठी कंपनीकडून सातत्यानं नवनवीन फीचर्स देण्यात येतात. डार्क मोड फीचर्सची अद्याप चाचणी सुरू आहे. मात्र कंपनीनं वापरकर्त्यांसाठी काही नवे फीचर्स देत दिलासा दिला आहे. त्यात कॉल वेटिंग हे एक फीचर आहे. अँड्रॉईड फोन वापरण्यासाठी हे फिचर लागू करण्यात आलं आहे. याआधी व्हॉट्स अॅपवरून फोन केल्यास दुसरं कुणीही कॉल केल्यास वेटिंग ऑप्शन दाखवत नव्हतं. मात्र ती सुविधा आता मिळणार आहे.
व्हॉट्सअॅपने युजर्सची एक समस्या दूर केली आहे. 4 वर्षापूर्वी कंपनीने वॉइस कॉलिंग फीचर सुरु केलं होतं. आता कंपनीने यामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. कंपनीने कॉल वेंटींगची सुविधा सुरु केली आहे. याआधी जर तुम्ही इतरांसोबत बोलत असाल तर दुसरा कोणाचा कॉल येतोय हे कळत नव्हतं. प्ले स्टोरवर आता व्हॉट्सअॅप अपडेट केलं तर हे नवं फीचर युजर्सला वापरता येणार आहे.
जेव्हा कोणताही युजर व्हॉटसअॅपवर दुसऱ्या युजर्ससोबत बोलत असेल तर त्याला आता दुसरा कॉल वेटींगवर दिसेल. महत्त्वाचा असेल तर तो युजर तो कॉल उचलू शकेल.