मुंबई : हूंडाईची लोकप्रिय एन्ट्री लेव्हल कार म्हणजे सेंट्रो! आता ही सेंट्रो कार लवकरच पुन्हा भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ही कार बजेट कार असून त्याची स्पर्धा मारूती सेलेरियो आणि टाटा टिगॉर या गाड्यांशी असणार आहे. 


सेंट्रो होणार 20 वर्षांची 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सप्टेंबर 2018 मध्ये हुंडाय सेंट्रो ही 20 वर्षाची होणार आहे. भारतामध्ये 23 सप्टेंबर 1998 साली सेंट्रो कार लॉन्च करण्यात आली होती. भारतामध्ये ही हुंडईची पहिली कार आहे.  


बजेट फेंडली कार 


लवकरच नव्या स्परूपात येणारी सेंट्रो कार सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारची किंमत सुमारे 3.5 लाख रूपये आहे. 


नव्या सेंट्रोची फीचर्स 


नव्या सेंट्रोमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये अ‍ॅन्ड्राईड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले सपोर्ट करणारे टचस्क्रिन इंफोटेंमेन्ट सिस्टम, ड्युल फ्रंट एअर बॅग्स, एबीएस आणि ईबीडीसह अनेक फीचर देण्यात येणार आहेत. 


नवी सेंट्रो ही I10 पेक्षा आकाराने मोठी असणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, इऑनच्या ऐवजी ही नवी सेंट्रो कार बाजारात उतरवण्यात येणार आहे. 


2018 मध्ये लॉन्च करण्यात येणार्‍या इयॉनमध्ये असणारे 1.0 लीटर कप्पा पेट्रोल इंजिन सेंट्रोमध्ये येणार आहे. इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅडर्ड असेल. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात येणार आहे. या कारचं मायलेज 25 किमी प्रति लीटरच्या आसपास असेल.