New Tyre Design: कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून बदलणार तुमच्या कारचे टायर, हे असणार फायदे
कारमध्ये नवीन डिझाईनचे टायर बसवणं बंधनकारक असणार आहे, जाणून घेऊया टायरमध्ये काय बदल होणार आहेत.
New Tyre Design : तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे आणि तुम्ही ती जरूर वाचा. 1 ऑक्टोबर 2022 पासून तुमच्या वाहनाच्या टायरची डिझाईन बदलली जाणार आहे. भारत सरकारने मोटार वाहन कायदा (MVA) मध्ये अनेक नियम लागू केले आहेत.
1 ऑक्टोबरपासून देशात नवीन डिझाइनचे टायर मिळण्यास सुरुवात होईल. लोकांना नवीन टायर घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, मात्र ही संधी 31 मार्चपर्यंत असेल. 1 एप्रिल 2023 पासून प्रत्येक वाहनात हे नवीन डिझाईनचे टायर बसवणं बंधनकारक असेल. तसे न केल्यास कारवाई होऊ शकते.
काय आहेत नविन नियम
तुम्ही जेव्हा बाजारातून एखादी वस्तू विकत घेता तेव्हा त्याचं रेटिंग दिलेलं असतं. चांगल्या रेटिंगच्या वस्तू विकत घेण्याकडे तुमचा कल असतो. पण टायरच्या बाबतीत असं आतापर्यंत होत नव्हतं. मोटार वाहन कायद्यात काही बदल करून सरकारने आता टायर्ससाठी स्टार रेटिंग अनिवार्य केलं आहे. नवीन सुविधेअंतर्गत आता ग्राहक टायर खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रत्येक माहिती घेऊ शकणार आहे.
किती प्रकारचे असतात टायर
तज्ज्ञांच्या माहितीनुसरा टायरचे 3 प्रकार आहेत. पहिला C1 आहे आणि तो प्रवासी कारसाठी आहे. दुसरा प्रकार C2 हा लहान व्यावसायिक वाहनांमध्ये वापरला जातो. टायर्सची तिसरी श्रेणी C3 आहे, जी अवजड व्यावसायिक वाहनांमध्ये वापरली जाते.
टायरचं डिझाईन बदलण्याचा उद्देश
सरकारने टायर्सबाबत केलेल्या बदलांतर्गत आता टायर्ससाठी तीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साउंड एमिशंस हे तीन पॅरामीटर्स आहेत. टायर कंपन्यांना आता याचे पालन करावे लागेल आणि बीआयएस मानकांच्या आधारे टायर बनवावे लागतील. नवीन प्रणालीने बनवलेले टायर पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित असतील.
आता टायर 3 मानके लक्षात घेऊन तयार करावे लागतील. अशा परिस्थितीत, लोकांना ही मानके समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
रोलिंग रेजिस्टेंस - रोलिंग रेझिस्टन्स म्हणजे कार किंवा वाहन खेचण्यासाठी किंवा ओढण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा. जर रेजिस्टेंस कमी असेल तर टायरला जास्त जोर द्यावा लागतो.
वेट ग्रिप - पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर टायर घसरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे काही वेळा अपघातही होतात. अशा परिस्थितीत आता वेट ग्रिपवर अधिक भर देण्यात आला आहे. नवीन डिझाइनमध्ये त्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
रोलिंग साउंड एमिशंस - टायर थोडा जुना असेल, तर वाहन चालवत असताना टायरमधून आवाज येत असल्याचे लक्षात येईल. सरकारने टायर कंपन्यांना नवीन डिझाइनमध्ये यावरही काम करण्यास सांगितलं आहे.