New Ola S1 Electric Scooter Price And Feature: ओलाच्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोटारसायकलप्रेमींमध्ये जोरदार चर्चा आहे. ओलाने भारतात S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली असून एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. नवीन S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखीच आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुक करता येईल. तसेच नवीन Ola S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून होईल. नवीन ओला S1 स्कूटरमध्ये 2.98 किलोवॅट बॅटरी पॅक असेल. त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. कंपनीचा  दावा आहे की, नवीन S1 सिंगल चार्जवर 141 किमीची रेंज देऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने नवीन S1 मध्ये MoovOS वैशिष्ट्ये दिली आहेत. म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप आणि रिव्हर्स मोड यासारखे फीचर्स आहेत. नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखी दिसते. याची डिझाइन आणि फीचर्स बरेचसे समान आहेत. ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होईल. यात जे जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट असतील. ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची स्पर्धा Ather 450X, Simple One, TVS iQube आणि Okinawa Okhi 90 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी असेल.


ओला S1 लाँच करण्यासोबतच, कंपनीने S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवीन 'खाकी' रंगसंगती  जाहीर केली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 'खाकी' रंगसंगतीसह ओला S1 Pro च्या 1947 युनिट्सची निर्मिती केली जाईल. ओला S1 Pro खाकी एडिशनची किंमत 1.49 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. यासोबतच ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक कारही सादर केली. ही कार 2024 मध्ये लाँच होणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, 'भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी दिसणारी कार असेल. ओलाची इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि 500 ​​किमी पेक्षा जास्त रेंज देईल. नवीन ओला इलेक्ट्रिक कारमध्ये असिस्टेड ड्राइव्ह टेक्नॉलॉजी, कीलेस ऑपरेशन आणि ओलाचे मूव्ह ओएस ही वैशिष्ट्य असतील.