मुंबई :  २०१७या वर्षात टेलिकॉम सेक्टरमध्ये हंगामा उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओच्या नव्या प्लान्सचा धडाका यंदाच्या वर्षातही कायम राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ यूजर्सना आजपासून दोन नव्या प्लान्सची सुविधा मिळणार आहे. जिओने नव्या वर्षात दोन नवे प्रीपेड ऑफर्स आणलेत. जिओने १९९ आणि २९९ रुपयांच्या हॅपी न्यू ईयर प्लान लाँच केलेत. यात यूजर्सना आधीच्या तुलनेत अधिक डेटा मिळणार आहे. 


१९९च्या प्लानमध्ये यूजर्सला १.२ जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री वॉईसकॉल, अनलिमिटेड एसएमएस आणि २८ दिवसांसाठी सर्व प्राईम मेंबरना जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. तर जिओने २९९ रुपयांचा प्लानही लाँच केलाय. यात युजर्सना दररोज २ जीबी ४ जी स्पीडने डेटा मिळेल. 


संपूर्ण महिन्यात ३३.६ जीबी डेटा


जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना दिवसाला १.२ जीबी डेटा मिळतोय. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचाच अर्थ युजर्सना संपूर्ण महिन्यात ३३.६ जीबी डेटा मिळणार. फ्री व्हॉईस कॉलिंगशिवाय जिओचे अन्य फायदेही मिळणार आहेत. 


२९९च्या प्लानवर ५६ जीबी डेटा


२९९च्या रुपयांच्या दुसऱा प्लानही जिओने लाँच केलाय. हा प्लान इतर सर्व प्लानच्या तुलनेत स्वस्त आणि मस्त आहे. यात केवळ तुमचे पैसेच वाचत नाहीत तुम्हाला डेटाही अधिक मिळतोय. या प्लानमध्ये तुम्हाला दिवसाला २ जीबी डेटा मिळतो म्हणजे महिन्याला ५६ जीबी डेटा तुम्ही वापरु शकता. 


२०१८मध्ये जिओचे हे काही प्लान


या दोन नव्या प्लान व्यतिरिक्त जिओचे जुने प्लानही युजर्सना उपलब्ध करुन देण्यात आलेत. कंपनीच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ४ जीबी डेटा मिळतो. ज्यांना कमी डेटा लागतो त्यांच्यासाठी हा प्लान आहे.