मुंबई : तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

sarahah.com या मोबाईल अॅपद्वारे ही संधी युझर्सना मिळतेय. सध्या अँन्ड्रॉईड आणि आयओएसवर हे मोबाईल अॅप उपलब्ध आहे.


केवळ ५ एमचं हे मोबाईल अॅप आत्तापर्यंत ५० लाखांहून जास्त युझर्सनं डाऊनलोड केलंय. हे मोबाईल अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं अकाऊंट बनवावं लागतं. त्यानंतर तुमच्या सोशल मीडियावर आपल्या प्रोफाइलची लिंक शेअर केल्यानंतर लगेचच वेगवेगळे मॅसेजेस तुम्हाला येऊ लागतील. 


तुम्हीही कुणाला काहीही मॅसेज करू शकता... आणि मॅसेजमध्ये तुम्ही तुमचं नाव लिहिलेलं नसेल तर हा मॅसेज कुणी पाठवलाय? हे कुणालाही कळणार नाही. 


हे मोबाईल अॅप जून महिन्यात लॉन्च करण्यात आलं होतं. सौदी अरबच्या जेन अल - अबीदीन तौफीकनं हे मोबाईल अॅप बनवलंय. 


परंतु, हे मोबाईल अॅप वापरताना सावधान... तज्ज्ञांनी या मोबाईल अॅपवर टीकाही केलीय. यामुळे ट्रोलिंग तसंच शाब्दिक लैंगिक शोषण किंवा अश्लिल मॅसेजलाही तुम्ही बळी पडू शकता... असे प्रकार घडत असतील तर ब्लॉक करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे.