मुंबई : जर तुम्ही नवीन मोबाईल फोन घ्यायच्या विचारत आहात. तर नव्या वर्षात नवे स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला नव्या वर्षात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. २०१९ मध्ये आयफोन ११, सॅमसंग गॅलक्सी A80 यांसारख्या स्मार्टफोनने मोबाईल प्रेमींच्या मनात छाप पाडली होती. आता २०२० मध्ये देखील एकापेक्षा एक स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Oppo Reno 3 
Oppo Reno 3 या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ ३४ हजार रूपयांपासून सुरू होणार आहे. या फोनमध्ये 8GB रॅम त्याचबरोबर 128 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 8GB रॅम त्याचबरोबर 128 GB स्टोरेज असणारा हा फोन ३६ हजार ९९९ रूपयांचा असणार आहे. फोनमध्ये 4020 mAh बॅट्री असणार आहे. शिवाय हा फोन ६.५ इंच स्क्रिनचा असणार आहे. 


OnePlus 8 pro
OnePlus 8 pro स्मार्टफोन ६.४ आणि ६.७ इंचचा असणार आहे. OnePlus 8 आणि OnePlus 8 proस्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरवर सादर केले जातील. या फोनमध्ये ४८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. ८ GB रॅम असणार आहे. 


Oppo Find X2
भारतात या फोनची किंमत ७२ हजार ९९० रूपये असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ४००० mAh बॅट्री आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. जो ४८MP+12MP+8MP आणि डबल फ्रंट २५MP+२MP कॅमेरा आहे. या फोनची स्क्रिन ६.५ इंच आहे.