मुंबई : काही वर्षांपूर्वी डायरेक्ट टू होम अर्थात डीटीएच सेवा उपलब्ध झाली तेव्हा 'जे चॅनल पाहाल केवळ त्याचेच पैसे भरा' अशी जाहिरात करण्यात आली... मात्र, स्पोर्टस, न्यूज, एन्टरटेन्मेट, किडस, नॉलेज असे वेगवेगळे पॅक्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सनं ग्राहकांसमोर ठेवल्यामुळे हे पॅक ग्राहकांना महागडे ठरू लागले. परंतु, आता मात्र टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात 'ट्राय'नं यावर उपाय शोधलाय. हा नवीन नियम २९ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक चॅनल हे पॅकमध्ये न निवडता स्वतंत्र पद्धतीनं किंवा बुकेमध्ये निवडण्याचा अधिकार ग्राहकांना राहील. उपभोक्ते आपली पसंत आणि किंमत ध्यानात घेऊन आपल्याला हव्या असलेल्या प्रत्येक चॅनलची निवड करू शकतात. ग्राहकांना 'निवडीचा अधिकार' उपलब्ध करून देणं हे या बदलामागचं कारण असल्याचं ट्रायचे अॅडव्हायजर अरविंद कुमार यांनी म्हटलंय.


नवीन नियमांनुसार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सर्व मल्टि सर्व्हिस ऑपरेटर्स (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्सना (LCOs) हे नवीन नियम बंधनकारक असतील


- तुम्हाला जे चॅनल पाहायचंय केवळ त्यासाठी पैसे भरा


- सर्व चॅनल वेगवेगळे आणि बुकेच्या स्वरुपात उपलब्ध असतील. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार त्याची निवड करू शकाल. 


- इलेक्ट्रॉनिक प्रोगाम गाईड (EPG) द्वारे टीव्ही स्क्रीनवर प्रत्येक चॅनलची किंमत लिहिलेली दिसेल. कोणताही डिस्ट्रीब्युटर त्यापेक्षा अधिक पैसे वसूल करू शकत नाही. 



किती होईल खर्च... 


- ट्रायच्या नियमांनुसार, चॅनल्सची किंमत १ ते १९ रुपयांपर्यंत निर्धारीत करण्यात आलीय


- नेटवर्क कपॅसिटी फीच्या स्वरुपात ग्राहकांना प्रत्येक महिन्याला १०० चॅनल्ससाठी जास्तीत जास्त १३० रुपये द्यावे लागतील. याच १३० रुपयांत तुम्ही फ्री टू एअर चॅनलचीही निवड करू शकाल. पे चॅनल्ससाठी मात्र तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल.


- जर तुम्ही १०० हून अधिक चॅनल पाहत असाल तर पुढच्या २५ चॅनल्ससाठी तुम्हाला अतिरिक्त २० रुपयेच भरायचे आहेत. 


- याशिवाय तुम्ही ज्या पेड चॅनलची निवड कराल केवळ त्याचीच किंमत तुम्हाला भरावी लागेल. 


- ग्राहकांना फ्री टू एअर चॅनल संपूर्णत: मोफत पाहायला मिळतील. परंतु, तुम्हाला कोणतं फ्री टू एअर चॅनल पाहायचंय किंवा नाही याची निवडही तुम्ही करू शकता


- दूरदर्शनचे सर्व चॅनल्स मात्र दाखवणं डिस्ट्रीब्युटर्सना अनिवार्य आहे


ग्राहकांना निवडीचा अधिकार

चॅनल्सची निवड कशी कराल?


सर्व केबल आणि डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर्सना आपापल्या वेबसाईटवर चॅनल निवडण्याची आणि ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आलेत. याशिवाय कॉल सेंटरद्वारेही उपभोक्ते चॅनलची निवड करू शकाल. 


तुमच्या पसंतीची 'झी २४ तास' ही वृत्तवाहिनी पाहण्यासाठी २९ डिसेंबरपूर्वी तुमच्या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे मागणी करा... अधिक माहितीसाठी ९१७६५६६४६६ या क्रमांकावर मिस्ड कॉल करा.