मेघा कुचिक, झी मडिया, मुंबई : मंगेश घोगरे....या तरुणानं भारतात सहज कुणी विचारही करणार नाही, असं काही तरी करून दाखवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगेशन घोगरनं अमेरिकेतल्या सर्वात प्रसिद्ध दैनिकात अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची मूळ संकल्पना घेऊन शब्दकोडं तयार केलं, आणि यंदा म्हणजे ४ जुलैला ते छापूनही आलं. 


अमेरिकन स्वातंत्र्यदिनी छापून येणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्समधल्या शब्दकोड्याला विशेष महत्व आहे. हे शब्द कोडं तिथली कुटुंब एकत्र ब्रेकफास्ट टेबलवर बसून सोडवण्याची परंपरा आहे...त्यामुळे मंगेशचं यश मोठं आहे.


शब्दकोडं सोडवणं जसं सोपं नसतं, तसचं ते तयार करणंही तितकंच जिकीरंचं असतं. त्यातही ते न्यूयॉर्क टाईम्ससाठी असेल तर विचारूच नका


मंगशेला एक शब्द कोडं तयार करण्यासाठी साधारण सात ते आठ महिने लागतात. अमेरिकन शब्दकोडं तयार करण्यासाठी पहिल्यांदा एक संकल्पना निश्चित करावी लागते. त्यानंतर त्यासंकल्पनेत बसणारे चार किंवा पाच मोठे शब्द शोधावे लागतात. 


२२५ रकान्यामध्ये सीमेट्रिकली म्हणजे कुठल्याही बाजूनं सारख्याच दिसणाऱ्या शब्दकोड्यात बसवावे लागता...नंतर इतर शब्दांची रचना करताना कोडं सोडवणाऱ्या कुणालाही कुठल्याही अक्षरापासून कुठल्याही अक्षरापर्यंत पोहचता येईल अशी रचना करावी लागते.


इतकं करून तुम्ही तुमचं कोडं न्यूयॉर्कला पाठवलंत...आणि तुमच्या संकल्पनेवर आधारित कोडं कुणीतरी आधीच करून झालेलं असेल...तर सगळी मेहनत पाण्यात.


मंगेश घोगरेनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलयं. त्यानंतर व्यवस्थापनाचं पद्व्यत्तर शिक्षण पूर्ण केलंय... पण त्याचं मन रमतं ते शब्दकोड्यांमध्ये...कोडी सोडवल्यानं मनाला निखळ आनंद मिळतो...आणि हा आनंद लोकांना मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो.


हे सांगताना मंगेशच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाही. मोबाईलमध्ये तोंड घालून व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये वेळ घालवणाऱ्यांसाठी मंगेशनं केलेल्या छंदाच्या जोपासनेतून बरचं काही घेण्यासारखं आहे...ते त्यांनी घ्यावं यासाठी हा प्रपंच....