मुंबई : जपानची कार मेकिंग कंपनी निसानने आपल्या सेकंड जनरेशन कार "लीफ" ला जपानमध्ये लाँच केलं आहे. इलेक्ट्रॉनिक कारमध्ये निसान ही अतिशय लोकप्रिय कार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता या कारमध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत निसान लीफचे २.८ लाख यूनिट विकल्या गेल्या आहेत. लीफ कारचे डिझाइन पूर्णपणे ऑटोनॉमस टेक्नॉलॉजीवर बेस आहे. लुक्सबद्दल बोलायचं झालं तर ही कार नव्या जनरेशन मायक्रो सारखी आहे. याच्या एरोडायनॅमिक्स डिझाइनला देखील बदलण्यात आलं असून याचं ड्रायव्हिंग अतिशय चांगली झाली आहे. 


एवढंच नाही तर या कारची बॅटरी क्षमता वाढवली असून फूल चार्जवर भरपूर लांबचा पल्ला गाठते. ही कार प्रति तास ४० किमी वेगाने चालते. पूर्ण चार्ज केल्यावर ४०० किमी ही कार चालू शकते. ही कार १४८ बीएचपी पावर आणि ३२० न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करू शकते. याचे आताचे डिझाइन अतिशय अॅग्रेसिव्ह आहे. 



निसान लीफ ही पहिली निसान गाडी असेल की ज्यामध्ये प्रो-पायलट पार्क सिस्टम देण्यात आली आहे. यामुळे गाडी पार्क करताना त्रास कमी होणार असून आधुनिक स्मार्ट वन पॅडल ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी देखील आहे.