मुंबईः  नितीन गडकरी यांनी लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवर उत्तर देताना, सांगितले की प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याची गरज आहे, इलेक्ट्रिक इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल. प्रदूषण हे केवळ भारतासमोरच नाही तर जगभरात मोठे आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असतील.


नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असतील. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे.



गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनात झपाट्याने होणारी प्रगती यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलच्या किमती कमी होतील. म्हणजेच याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीची असेल. त्यातून क्रांती होऊ शकते, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.


गडकरी यांनी खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. खासदारांनी आपापल्या भागातील सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल असेही त्यांनी सांगितले.



नितीन गडकरी म्हणाले, 'लिथियम आयर्न बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयर्न, ऍल्युमिनियम-आयर्न, सोडियम-आयर्न बॅटरी विकसित करत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल.