नवी दिल्ली : नोकिया स्मार्टफोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने आपला ‘नोकिया २’ स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा फोन या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये मिळणारे सर्वच बेसिक फिचर्स आहेत. मेटल फ्रेम आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन असणा-या स्मार्टफोनची बॅक बॉडी पॉलीकार्बोनेटने तयार करण्यात आलीये.   


नोकियाचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. कॉपर ब्लॅक, प्यूटर ब्लॅक आणि व्हाईट रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात हा स्मार्टफोन मिळणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची ग्लोबल प्राईस ९९ यूरो(साधारण ७ हजार ५०० रूपये) इतकी ठेवली आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत ६ हजार ९९९ रूपये इतकी असेल असे सांगितले जात आहे. 


नोकिया २ अ‍ॅन्ड्रॉईड ७.१.१ नॉगट ऑपरेटीग सिस्टमवर रन होतो आणि यात लवकरच अ‍ॅन्ड्रॉईड ८.० ओरिओ अपडेट केला जाईल. फोनमध्ये ५ इंचाची एचडी स्क्रीन दिली आहे. एचएमडी ग्लोबलने दावा केलाय की, या स्मार्टफोनमधील बॅटरी ४१०० mAH दोन दिवसांपर्यंत चालते. क्वॉड-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन २१२ प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये १ जीबीची रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. 


नोकिया २ मध्ये यूजर्सना ५ मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस फ्रन्ट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत मिळेल. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये जीपीएस, ग्लोनास, वायफाय ८०२.११, एफएम रेडिओ आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन ड्यूल सीम आहे.