नवी दिल्ली : नोकियाचा 3310 हा 4G फोन लॉन्च होण्यापूर्वी या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील TENNA या वेबसाईटने नोकिया 3310 च्या 4G व्हेरिएंटचे सर्व फिचर्स लीक केले आहेत.


नोकियाचे राईट्स असलेली कंपनी HMD ग्लोबलने गेल्यावर्षी हा फोन रिलॉन्च केला होता. रिलॉन्चपूर्वी कंपनीने याचे दोन व्हेरिएंट 2G आणि 3G लॉन्च केले होते. मात्र, आता याचा 4G व्हेरिएंट येण्याची चर्चा सुरु झाली आहे. पण लॉन्च होण्यापूर्वीच याचे फिचर्स लीक झाले आहेत.


नोकिया कंपनीने अद्याप यासंदर्भात कुठलीच माहिती दिलेली नाहीये. कंपनी हा फोन MWC 2018 मध्ये लॉन्च करणार असल्याची चर्चा होत आहे.


LTE बँडला सपोर्ट करणार फोन


नोकियाचा 4G व्हेरिएंट असलेला हा फोन LTE बँडला सपोर्ट करणार आहे. चीनच्या वेबसाईटने जे फिचर्स लीक केले आहेत त्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे. बँड 38, बँड 39, बँड 40 आणि बँड 41 सोबतच GSM, TD-SCDMA आणि TD-LTE वरही हा फोन काम करणार आहे. नोकिया 3310 या व्हेरिएंटचा मॉडल नंबर TA-1077 आहे.


जिओ फोनला देणार टक्कर 


भारतामध्ये नोकिया 3310 फोनच्या 4G व्हेरिएंटची रिलायन्स जिओच्या 4G स्मार्टफोनसोबत टक्कर होणार आहे. नोकियाचा हा मॉडल 20 वर्ष जुना असल्यासोबतच खूपच प्रसिद्धही आहे.


जिओ फोनच्या पहिल्या बुकिंगमध्येच 60 लाख फोन्सची विक्री झाली होती. तर, मायक्रोमॅक्सनेही आपला 4G फिचर फोन बाजारात लॉन्च केला आहे. त्यामुळे नोकिया 3310 या 4G व्हेरिएंटला दुसऱ्या कंपनीच्या फोनसोबत स्पर्धा करावी लागणार आहे.


काय आहे 4G व्हेरिएंटमध्ये?


  • 256 MB रॅमसोबत 1.5 Ghz ड्युअल कोअर प्रोसेसर


  • 512 MB इंटरनल मेमरी आणि 128 GB मायक्रो एसडी सपोर्ट


  • 2.4 इंच TFT स्क्रिन, रिझॉल्युशन 240X320 पिक्सल


  • 2 MP रियर कॅमेरा आणि 1200 mAh बॅटरी