नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी नोकीया 3310 पुन्हा लॉन्च झाल्याने चर्चेत होता. आता त्याचे 4G व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. यापूर्वी नोकीया 3310 चे 3G आणि 2G व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन युन ऑपरेटींग सिस्टमवर काम करेल. भारतीय बाजारात हा फोन जिओला टक्कर देऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकीयाचा हा फोन वायफाय आणि हॉटस्पॉटला सपोर्ट करतो. एचएमडीने चीनमध्ये हॅंडसेट उपलब्ध करण्यासाठी चायना मोबाईलसोबत करार केला आहे. चीन बाहेर या फोनची किंमत आणि उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


डिस्प्ले


नोकीया 3310 च्या 4G व्हेरिएंटमध्ये 320×240 पिक्सल रिजोल्यूशनचा 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 4G वीओएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर 512 एमबीची इंटरनल मेमरी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून ती 64 GB पर्यंत वाढवता येईल.


कनेक्टिविटी आणि बॅटरी


कनेक्टिविटीसाठी नोकीयाच्या या फिचर फोनमध्ये ब्लूटूथ 4.0, मायक्रो युएसबी आणि वायफाय 802.11  आहे. यात एफएम रिडिओ देखील सपोर्ट होतो. फिचर फोनच्या तुलनेत यात 1200 mAh ची दमदार बॅटरी आहे.



कॅमेरा


नोकीयाच्या नव्या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत 2 MP चा रियर कॅमेरा आहे. हॅंडसेटची साईज 117 x 52.4 x 13.35 मिलीमीटर आणि वजन  88.1 ग्रॅम आहे. फ्रेश ब्लू आणि डार्क ब्लू रंगात हे फोन बाजारात उपलब्ध आहेत.