नवी दिल्ली : नोकियाचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन नोकिया ६ (NOKIA 6) आज लॉन्च होऊ शकतो. पण अजून या लॉन्चिंगबाबत कोणतही ऑफिशिअल स्टेटमेंट आलेलं नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, आज म्हणजेच ५ जानेवारीला हा फोन लॉन्च होऊ शकतो. त्यासोबतच या फोनचे स्फेसिफिकेशनही लीक झाल्याचा दावा केला जात आहे. हा दावा चीनच्या एका रिटेलरने केला आहे. 


फिचर्स


फोनच्या लीकच्या झालेल्या स्पेसिफिकेशनबाबत सांगायचं तर नोकियाची सहकारी कंपनी एचएमडी ग्लोबल नवीन हॅंडसेटमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी १९२० x १०८० डिस्प्ले देऊ शकते. फोनचा हा डिस्प्ले १८:९ च्या ऑस्पेक्ट रेशोसोबत येईल. यात Qualcomm Snapdragon 630 प्रोसेसर दिलं जाऊ शकतं. जे ४ जीबी रॅमसोबत मिळेल.  


कॅमेरा किती मेगापिक्सल?


यासोबतच नोकियाच्या या फोनमध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबी मेमरीचा पर्याय देण्यात आलाय. अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जनची माहिती सध्या समोर आलेली नाहीये. पण त्यात ८ मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सल कॅमेरा असेल. सोबतच फोनमध्ये रिअर माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. Nokia 6 स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीला मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून १२८ जीबी पर्यंत वाढवता येईल. 


कोणत्या रंगांचा पर्याय...


नोकिया ६ मध्ये ३ हजार एमएएच पावरची बॅटरी दिली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच नोकिया ६ चे दोन व्हेरिएंट TENAA वर पाहिलं गेलं होतं. रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, नोकिया ६ पांढ-या, काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध होईल.