मुंबई : एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ भारतात लॉन्च केलाय. याची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरु झाली. अॅमेझॉन या ऑनलाईन पोर्टवर उपलब्ध झालाय. ज्यांनी ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला रजिस्टेशन केले आहे. त्यांनाच हा फोन घेता आला आहे. याची किंमत १४,९९९ रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉनवर नोकिया-६ वर ऑफर देण्यात आली आहे. प्राईम सदस्यांसाठी ही ऑफर आहे. अॅमेझॉन पेवर १००० रुपये कॅशबॅक आहे. तसेच या फोनसोबत व्होडाफोन कार्ड घेतल्यास ४५ जीबी डेटा आणि पाच महिन्यांच्या कालावधीसाठी २५०० रुपयांची सूट आहे.


नोकिया-६ मॅट ब्लॅक आणि सिल्वर रंगात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ५.५ इंच असून फूल एचडी डिसप्ले  आहे. २.५ डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास असून यात क्लालकॉम स्नेपड्रगर ४३० ओक्टाकोर चिपसेट आहे. हा फोन ३ जीबी रॅम असून ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच २५६ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डने मेमरी वाढवता येऊ शकते.


या फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंट ८ मेगापिक्सेल आणि रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहे. या फोनची बॅटरी क्षमता ३,००० एमएएच आहे. या स्मार्टफोन एंड्राइड नॉगटवर आधारित आहे. नोकिया ६मध्ये कनेक्टिव्हीटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर, वाय-फाय, ब्लूटूथ आणि युएसबी टाईप सी-पोर्ट देण्यात आलाय.


भारतात नोकिया -३ , नोकिया -५ आणि नोकिया -६ लॉन्च केलाय. नोकिया -३ आणि नोकिया -५ आणि नोकिया -६ अनुक्रमे ९,४९९ रुपये, १२,८९९ रुपये आणि १४,९९९ रुपये अशी किंमत आहे.