नोकियाचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, भारतात ही असेल किंमत
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ हा फोन अमेरिकेत लॉन्च केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत कंपनीने पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन १६ ऑगस्टला लंडनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत आधीच बाहेर आलेय.
मुंबई : एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ हा फोन अमेरिकेत लॉन्च केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत कंपनीने पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन १६ ऑगस्टला लंडनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत आधीच बाहेर आलेय.
नोकियाने स्मार्टफोनमध्ये जोरदार कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नोकिया ८ हा तगडा फोन बाजारात आणत आहे. EUR 517.42 डिवाइसमध्ये असून काळा असून यात वेगवेगळ्या शेड असतील. याची भारतीय किमत ३९,००० रुपये असेल. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असेल. यात मायक्रो एसडी सपोर्टनेम मेमरी वाढवू शकता. यात रिअर १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट ८ मेगापिक्सेल कॅमेरा असून फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेत एचडी डिस्प्ले असून १४४० x२५६० पिक्सेल रेसोल्यूशन असेल. हा क्लॉलकॉम स्नॅपड्रॅन ८३८ प्रोसेसरवर चालेल.
दरम्यान, नोकिया-६ ची किंमत २२९ डॉलर (अर्थात १४,८०० रुपये) आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यापासून अमेरिकेत विक्रीला उपलब्ध झाला आहे.
नोकिया-६ मॅट ब्लॅक आणि सिल्वर रंगात उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ५.५ इंच असून फूल एचडी डिसप्ले आहे. २.५ डी गोरिला ग्लास असून यात क्लालकॉम स्नेपड्रगर ४३० ओक्टाकोर चिपसेट आहे. हा फोन ३ जीबी रॅम असून ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच २५६ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डने मेमरी वाढवता येऊ शकते.
या फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंट ८ मेगापिक्सेल आणि रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहे. या फोनची बॅटरी क्षमता ३,००० एमएएच आहे. या स्मार्टफोन एंड्राइड नॉगटवर आधारित आहे. नोकिया ६मध्ये कनेक्टिव्हीटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर, वाय-फाय, ब्लूटूथ आणि युएसबी टाईप सी-पोर्ट देण्यात आलाय.
भारतात नोकिया -३ , नोकिया -५ आणि नोकिया -६ लॉन्च केलाय. नोकिया -३ आणि नोकिया -५ आणि नोकिया -६ अनुक्रमे ९,४९९ रुपये, १२,८९९ रुपये आणि १४,९९९ रुपये अशी किंमत असणार आहे.