नोकियाचा सर्वात जबरदस्त NOKIA 8 लॉन्च, बघा फिचर्स आणि किंमत
नोकियाने नुकताच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Nokia 8 लॉन्च केलाय. हा जगातला पहिला असा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन आहे ज्यात Carl Zeiss ऑप्टिक्स देण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टफोनला अॅडव्हान्स अॅल्यूमिनियम बॉडी देण्यात आली आहे. एचएमडी ग्लोबलने दावा केलाय की, Nokia 8 मध्ये जगातलं पहिलं ड्युअल साईट व्हिडिओ फिचर देण्यात आलं आहे. ज्याद्वारे फेसबुक आणि यूट्यूबवर रिअलटाईम करता येईल. ड्युअल साईटच्या द्वारे एकत्र फ्रंट आणि रिअर कॅमेरा वापरता येईल.
नवी दिल्ली : नोकियाने नुकताच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Nokia 8 लॉन्च केलाय. हा जगातला पहिला असा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन आहे ज्यात Carl Zeiss ऑप्टिक्स देण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टफोनला अॅडव्हान्स अॅल्यूमिनियम बॉडी देण्यात आली आहे. एचएमडी ग्लोबलने दावा केलाय की, Nokia 8 मध्ये जगातलं पहिलं ड्युअल साईट व्हिडिओ फिचर देण्यात आलं आहे. ज्याद्वारे फेसबुक आणि यूट्यूबवर रिअलटाईम करता येईल. ड्युअल साईटच्या द्वारे एकत्र फ्रंट आणि रिअर कॅमेरा वापरता येईल.
४GB रॅमसोबत ६४GB ची इंटरनल मेमरी :
नोकियाने सांगितले की, हा जगातला पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात Nokia OZO देण्यात आलं आहे. याने यूजर्स ३६० डिग्री ऑडिओचा अनुभव घेऊ शकतील. याला अॅल्यूमिनियम बॉडीसहीत हाय ग्लॉस मिरर फिनिश देण्यात आलं आहे. नोकियाने फोटो आणि व्हिडिओसाठी गुगल फोटोजमध्ये अनलिमिटेड स्टोरेज देण्याचंही आश्वासन दिलं आहे. या फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८३५ दिलं आहे. यात ४ जीबी रॅमसोबत ६४ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आलीये. मायक्रो एसडी कार्डने ही मेमरी २५६ जीबी इतकी वाढवता येईल.
आयपीएफ एलसीडी व्कॉड एचडी डिस्प्ले :
मीडिया रिपोर्टनुसार, Nokia 8 चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात पॉलिश्ड ब्ल्यू, पॉलिश्ड कॉपर, टेम्पर्ड ब्लू आणि स्टील यांचा समावेश आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत ५९९ यूरो म्हणजेच साधारण ४५ हजार इतकी ठरवली आहे. काही निवडक देशांमध्ये याची विक्री सप्टेंबरमध्ये सुरू होईल. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये असेल त्यातील एक सिंगल सिम तर दुसरा ड्युअल सिम असेल. Nokia 8 मध्ये ५.३ इंचाचा आयपीएफ एलसीडी क्वॉड एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. हा गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे.
ड्युअल लेंस सेटअपसोबत रिअर कॅमेरा :
ड्युअल लेंस सेटअपसोबत रिअर कॅमेरा दिला गेलाय. यात एक ऑप्टिकल इमेज स्टेब्लायझेशनसोबत १३ मेगापिक्सल आणि दुस-या कॅमेरात १३ मेगापिक्सलचा मोनोक्रोम लेंस देण्यात आलाय. सेल्फीसाठी यात फेस डिटेक्शन ऑटो फोकससोबत १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. त्यासोबतच अनेक कनेक्टीव्हीटीसाठी अनेक स्टॅडर्ड फिचर्सही देण्यात आले आहेत.