Nokia Cheap 5g Smartphone : HMD Global ने गेल्या आठवड्यात Nokia G60 5G स्मार्टफोन लॉन्च केला. नोकियाने टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करुन हे उपकरण तयार केले आहे. कारण हा सर्वात पर्यावरणास अनुकूल जी-सिरीजचा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 100 टक्के पुनर्वापर करण्यायोग्य पॉली कार्बोनेट बॅक आणि 60 टक्के पुनर्वापर करण्यायोग्य पॉली कार्बोनेट फ्रेमसह बनवला गेला आहे. HMD Global ने Nokia G60 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केल्याने यावर उड्या पडण्याची शक्यता आहे. या फोनची विक्री सुरु झाली आहे. या  Nokia G60 5G ची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या. 


नोकिया G60 5G ची भारतातील किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nokia G60 5G फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये 6GB + 128GB मध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 29,999 रुपये आहे. हा नवा फोन नोकिया इंडियाच्या वेबसाइटवरून तसेच देशभरातील इतर रिटेल शॉपमधून खरेदी केला जाऊ शकतो.


Nokia G60 5G ची फीचर्स


Nokia G60 मध्ये 6.58-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट  120Hz आणि कमाल 500nits ब्राइटनेस आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5  प्रोटेक्शन आणि वॉटरड्रॉप नॉचसह फुल एचडी + रिझोल्यूशन आहे.


Nokia G60 5G ची बॅटरी क्षमता


Nokia G60 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारे संचालित आहे. 6GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह जोडलेले आहे. या फोनची बॅटरी 4,500mAh पॅक डिव्हाइसला शक्ती देते आणि 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइसचे मुख्य लक्ष्य दीर्घकाळ टिकणारे आणि टिकाऊ असणे आहे. हे "3-3-2" गॅरेंटी पूरक आहे. ज्यामुळे डिव्हाइसला तीन वर्षांचे महत्त्वपूर्ण OS अपग्रेड, मासिक सुरक्षा अद्यतने आणि दोन वर्षांची वॉरंटी मिळेल.


नोकिया G60 5G फोनचा कॅमेरा


Nokia G60 5G मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप पॅक देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याचवेळी, फ्रंटला  एक 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.  फिंगरप्रिंट स्कॅनर,  Android 12 OS, IP52 वॉटर फ्रुफ आणि बरेच काही समाविष्ट आहे.