मुंबई : मोबाईल मार्केटमध्ये आता नोकिया नव्याने उतरत आहे. नोकियाचे ३ अँड्रॉईड मोबाईल भारतीय  बाजारपेठेत दाखल होत आहे.  नोकियाचे हे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे स्मार्ट फोनमध्ये स्पर्धा वाढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या १५ जून रोजी नोकियाचे हे मोबाईल बाजारात दाखल होत आहेत. एचएमडी ग्लोबल कंपनीने हे फोन तयार केले आहेत. हीच कंपनी जगभरात नोकियाच्या ३, ५ आणि ६ या अँड्रॉईड मोबाईलची विक्री करणार आहे. 
अलिकडेच नोकियाचा ३३१० हा फोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. 


आता आणखी तीन स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. यातील नोकिया ३ हा फोन १० हजारांत, नोकिया ५ हा फोन १५ हजारांत आणि नोकिया ६ हा फोन १८ हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे.