मुंबई : मोबाईल निर्माता कंपनी एचएमडी ग्लोबलनं बुधवारी आपले तीन नवे स्मार्टफोन लॉन्च केले. दमदार फिचर्ससहीत लॉन्च झालेले नोकिया ६, नोकिया ७ प्लस आणि नोकिया ८ Sirocco हे ते तीन मोबाईल आहेत.


नोकिया ६ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया ६ ची भारतातील किंमत १६,९९९ रुपये आहे. या फोनची विक्री कंपनीकडून ६ एप्रिलपासून सुरू होईल. या फोनवर कंपनीकडून कॅशबॅक ऑफरही दिली जातेय. 


ड्युएल सिमवाला नोकिया ६ अॅन्ड्रॉईड ८.० ओरिओवर चालतो. यामध्ये ५.५ इंचाचा फूल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आलाय. ३ आणि ४ जीबी रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन मिळू शकेल. ८ मेगापिक्सल फ्रंट आणि १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा यात देण्यात आलाय. 


नोकिया ७ प्लस


गुरुवारी नोकिया ७ प्लस सहा इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेमध्ये लॉन्च करण्यात आलाय. हा एन्ड्रॉईड ८.१ ओरियोवर चालतो. प्रोटेक्शनसाठी स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लासही देण्यात आलाय. 


नोकिया ७ प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर, दोन रिअर कॅमेरे देण्यात आलेत. मागच्या भागावर १२ मेगापिक्सलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. कॅमेऱ्यात २ एक्स ऑप्टिकल झूम देण्यात आलाय. यात ३८०० mAh ची बॅटरी देण्यात आलीय. 


नोकिया ७ प्लसला ड्युएल रिअर कॅमेरा २ एक्स ऑप्टिकल जूकसोबत आहे. ६००० सीरीज अॅल्युमिनिअमच्या एका ब्लॉकनं हा फोन बनवण्यात आलाय. यामध्ये फेस अनलॉक आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स फीचर आहेत. या फोनची किंमत आहे २५,९९९ रुपये. कंपनीकडून या फोनची विक्री ३० एप्रिलपासून सुरू होईल. 


नोकिया ८ Sirocco 


नोकियाचा तिसरा फोन नोकिया ८ Sirocco ही लॉन्च करण्यात आलाय. या फोनची किंमत आहे फक्त ४९,९९९ रुपये. 


नोकिया ८ Sirocco मध्ये ५.५ इंचाचा पोलेड डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, ड्युअल रियर कॅमेरा आणि स्टेनलेस स्टीलची फ्रेम देण्या आलीय. 


नोकिया ८ Sirocco ची प्री-बुकिंग २० एप्रिलपासून सुरू होईल तर विक्रीसाटी हा फोन ३० एप्रिलपासून उपलब्ध असेल.