Nokia Lumia HMD Skyline: मोबाईल फोन्स युगाला सुरुवात झाली तेव्हा नोकीया फोनने मार्केट जाम केलं होतं. सर्वांच्या हातात नोकीया फोन पाहायला मिळायचा. दरम्यान मधल्या काळात नवनवीन कंपन्या देशात आल्या. या स्पर्धेत नोकीयाचा टिकाव लागला नाही. ही नोकीय कंपनी स्पर्धेबाहेर पडली. पण आता नोकीया पुन्हा मार्केट जाम करण्यासाठी सज्ज झाली आहे. नोकीयाने आपला आयकॉनिक नोकीया लुमिया 920 ची मार्केटमध्ये दमदार एन्ट्री होतेय. HMD Skyline हा पुढच्या महिन्यात बादारात येत असून हा फोन सध्याच्या मोठमोठ्या कंपन्यांशी तगडी स्पर्धा करेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया स्मार्टफोन्स बाजारात आणण्यासाठी, ओळख मिळवून देण्यासाठी HMD ग्लोबल  लाओळखले जाते.


एचएमडी ग्लोबल कंपनी आपली ग्राहकांसाठी दरवेळेस नवीन काहीतरी खास घेऊन येते. यावेळेसही कंपनी आपल्या ग्राहकांना अजिबात निराश करणार नाही. गेल्या महिन्यातच कंपनीने प्रतिष्ठित नोकीया 3210 चे अपडेट आणले. हे ग्राहकांना आवडले होते.  या सीरिजमध्ये कंपनी आपल्या यूजर्ससाठी आणखी एक जुना फोन एका नवीन स्टाइलमध्ये आणणार आहे.


Nokia Lumia 920 हा एक आकर्षक डिझाइन केलेला फोन आहे. आजकाल कंपनी स्कायलाइन नावाच्या नवीन फोनवर काम करत आहे. या फोनचा लुक आयकॉनिक Nokia Lumia 920 सारखा असल्याचे दिसून आले आहे. कंपनी पुढील महिन्यात हा फोन लॉन्च करू शकते.



फोनमध्ये कोणते संभाव्य फिचर्स?
एचएमडी स्कायलाइन बाजारात येण्याआधीच त्याच्या फिचर्सबद्दलची माहिती समोर आली आहे. एचएमडीचा हा फोन एफएचडी + 120hz OLED डिस्प्ले सह आणला जाऊ शकतो. कंपनीचा हा नवीन फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर सह आणला जाऊ शकतो. तसेच
कंपनी 108mp मुख्य कॅमेरासह HMD Skyline आणू शकते. सेल्फीसाठी फोन 32mp फ्रंट कॅमेरा सह येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. 


HMD Skyline फोनमध्ये 4900mah बॅटरी असू शकते. फोन 33w फास्ट चार्जिंग फीचरसह आणला जाऊ शकतो. 


रॅम आणि स्टोरेज 
एचएमडी स्कायलाइनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असू शकते असे म्हटले जात आहे. नोकीया लुमिया 920 डिझाईन असलेल्या या फोनमध्ये गुगलची अपडेटे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम Android 14 असेल असे म्हटले जात आहे.