मुंबई : नोकियाचा ( Nokia) टॅबलेट iPadशी स्पर्धा करण्यासाठी येत आहे. कमी किमतीत सर्वकाही उपलब्ध होईल, अशी याची फीचर्स आहेत. एचएमडी ग्लोबल (HMD Global) लवकरच नोकिया टी 20 टॅबलेट ( Nokia T20 Tablet ) लॉन्च करणार आहे. टॅब्लेटची किंमत आणि वैशिष्ट्ये लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहेत. यामध्ये 10.36 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. चला किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HMD Global लवकरच आपला पहिला टॅब्लेट लॉन्च करणार आहे. त्याचे नाव नोकिया टी 20 टॅबलेट  ( Nokia T20 Tablet ) असेल. टॅब्लेट बाजारामध्ये सॅमसंग आणि आयफोनने लोकांची मने जिंकली, तर दुसरीकडे नोकिया या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आपले पहिले टॅबलेट बाजारात आणत आहे. टॅब्लेटची किंमत आणि वैशिष्ट्ये लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहेत. आम्ही आपल्याला सांगू, कंपनी आपल्याला कमी किंमतीत सर्व काही देण्याची योजना आखत आहे.  


दोन प्रकारात लॉन्च करणार 


मिळालेल्या माहितीनुसार, नोकिया टी 20 टॅबलेट  ( Nokia T20 Tablet ) दोन प्रकारामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. नोकिया टी 20 यूकेमधील एका विक्रेता वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. तो वाय-फाय आणि वाय-फाय + 4 जी प्रकारात येण्याची शक्यता आहे. TA-1392 आणि TA-1397 हे मॉडेल क्रमांक असलेले नोकियाचे दोन टॅब्लेट रशियन प्रमाणपत्र वेबसाइटवर पाहिले गेले आहेत. असा अंदाज वर्तविला जात आहे की, हे मॉडेल क्रमांक लवकरच नोकिया टी -20 मध्ये लॉन्च केले जातील. यामध्ये 10.36 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिसू शकतो. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल.


नोकिया टी 20 टॅब्लेटची किंमत किती ?


Nokia T20 Tablet हा टॅबलेट प्रथम युरोपियन देशांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. त्याच्या 4G व्हेरिएंटची किंमत सुमारे 20 हजार आणि वाय-फाय प्रकाराची किंमत सुमारे 19 हजार असू शकते. हा टॅबलेट वर्षाच्या शेवटी म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.


Nokia N1 आणि Nokia Lumia यांच्यानंतर लॉन्च करण्यात येणारा हा तिसरा टॅबलेट असेल. हे दोन्ही टॅबलेट अनुक्रमे 2014 आणि 2013 मध्ये लॉन्च केले होते.