Social Media -  आजकाल प्रत्येकांचं युग हे सोशल मीडियाच्या आजूबाजूला फिरतं. सोशल मीडिया हे सध्या आपल्या भावना मांडण्याचं बेस्ट ऑप्शन मानलं जातं. पण या सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या एका पोस्टमुळे कोण्याचा भावना दुखावू शकतात. अगदी कोणाची डोकी खराब होऊ शकतात. सोशल मीडियावर काही पोस्ट हे गुन्हेगारी वृत्तीला चालना मिळू शकते. या व्हर्चुअल जगामध्ये वावरताना अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा आपली पण गत केतकी चितळे हिच्यासारखी होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सोशल मीडियावर फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि अन्य दुसरे प्लॅटफॉर्म्स आहेत. या सोशल मीडियावर भारतातील करोडो यूजर्स सक्रीय असतात. सोशल मीडियावरील पोस्टवर पोलिसांची बारीक नजर असते. जर पोलिसांना तुमच्या पोस्टमध्ये काही पण चुकीचं आढळल्यास पोलिसांनी त्यांचावर कारवाई करतात. त्यामुळे अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून सोशल मीडियावर पोस्ट करताना खालील दिलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या.


या गोष्टींकडे लक्ष द्या


1. द्वेष पसरवणारी पोस्ट करु नका.
2. धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाळा
3. दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारी पोस्ट शेअर करु नका.
4. प्रक्षोभक किंवा हिंसा निर्माण करणाऱ्या गोष्टी शेअर करु नका.
5. पोस्ट लिहिताना भाषेवर लक्ष द्या.
6. कुठल्याही व्यक्तीचा अपमान होईल अशी भाषा किंवा फोटो वापरू नका. 
7. देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धक्का बसेल असं काही करु नका.


भारतात सोशल मीडिया पोस्टसंदर्भात कायदे करण्यात आहे आहेत. नियमबाह्य मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000नुसार दोषी ठरवलं जातं. केतकी चितळेने सोशल मीडियावर शरद पवारांविषयी प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे केतकीला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर काही पण पोस्ट शेअर करताना लक्ष द्या. फक्त लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही पण शेअर करु नका, नाही तर त्या पोस्टबद्दल तुम्हाला खूप मोठा भुर्दंड भरावा लागेल.