नवी दिल्ली : सरकारी कामांसोबतच आता प्रायव्हेट सेवांसाठी आधार लिंक करण्याची वेळ आली आहे. ई-कॉमर्स सेक्टरमधील मोठी कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅमेझॉन अकांऊटसोबत आधार लिंक करण्याचे सांगितले आहे. अ‍ॅमेझॉनकडून सांगण्यात आलंय की, वेबसाईटवर आधार लिंक केल्याने कोणतही हरवलेलं पॅकेज सहज शोधलं जाऊ शकतं. 


अनेक गोष्टींसाठी आधार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजफिड न्यूज दिलेल्या वृत्तात एका ग्राहकाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, अनेक गोष्टींसाठी आधार अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे. 


समस्या सोडवण्यास उशीर


अ‍ॅमेझॉनकडून ग्राहकांना सांगण्यात येत आहे की, आधारची कॉपी वेबसाईटवर अपलोड न केल्यास कोणतीही समस्या आल्यावर ती सोडवण्यास उशीर लागू शकतो. आधीच सरकारने वेगवेगळ्या योजनांसाठी आधार सक्तीचं केलं आहे. यावर टीकाही होत आहे. अशातच आता अ‍ॅमेझॉनने हा निर्णय घेतला आहे. 


अ‍ॅमेझॉन अकाऊंटसोबत आधार लिंक न केल्यास?


आधार दिलं नाही तर अ‍ॅमेझॉन कोणतीही समस्या सोडवण्याची गॅरंटी घेणार नाही. जर तुमच्याकडे आधार नसेल आणि अशात तुमची एखादी ऑर्डर हरवली तर अ‍ॅमेझॉन तुमच्या इतर आयडी प्रूफच्या आधारे ऑडर्स शोधण्याचा प्रयत्न करेल. पण यामुळे ते शोधण्यात उशीर होऊ शकतो. इतकेच नाहीतर बजफिडच्या बातमीनुसार, ज्या ग्राहकांनी आधार लिंक केले नाहीत त्यांच्या तक्रारीही अ‍ॅमेझॉन घेत नाहीयेत. 


इतर कंपन्याही मागतिल आधार?


अशी चर्चा आहे की, एअरबीएनबी, उबर आणि ओला सारख्या कंपन्या सुद्धा आधार सक्तीचं करण्यासाठी मार्ग शोधत आहेत.