Punishable Offence To Talk With Pillion Rider: आतापर्यंत तुम्हाला वाहन चालवताना कशासाठी दंड झाला आहे? असं विचारलं तर तुम्ही परवाना नसणे, हेल्मेट नाही, पीयूसी नाही यासरख्या कारणांसाठी चलान कापलं असं सांगाल. मात्र आता यामध्ये अजून एका गोष्टीची लवकरच भर पडू शकते ती म्हणजे गाडी चालवणाऱ्याशी मी बोलत होतो म्हणून मला पोलिसांनी दंड केला. नाही मस्करी नाही खरोखरच आता असा कायदा करण्यात आला आहे की दुचाकी चालवताना मागे बसलेली व्यक्ती चालकाशी बोलत असेल तर त्या दुचाकीचं चलान कापलं जाऊ शकतं. यासंदर्भातील माहिती वाहतूक विभागाने दिली असून कारवाई करण्याचे आदेश दिलेत.


चलान कापणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर लोकांनी अधिक सुरक्षितपणे वाहने चालवावीत म्हणून हा नियम करण्यात आला आहे. दुचाकी चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीबरोबर चालक गप्पा मारत असेल तर दुचाकीचं चलान कापलं जाऊ शकतं. वाहतूक विभागाने राज्यातील सर्व वाहतूक परिवहन कार्यालयांना अशा चालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोणतीही सबब न देता असा चालकांना दंड ठोठवा जे दुचाकी चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीबरोबर बोलत असतील, असं वाहतूक विभागाने सांगितलं आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी दिलासादायक बातमी इतकीच आहे की हा नवा कायदा महाराष्ट्रात नाही तर केरळ राज्यात करण्यात आला आहे. 


नव्या कायद्यामागील लॉजिक काय?


केरळ मोटर व्हेइकल डिपार्टमेंट म्हणजेच केरळमधील वाहतूक विभागाने हा नवीन कायदा आणला आहे. मागे बसलेल्या व्यक्तीबरोबर किंवा मागे बसलेली व्यक्ती चालकाबरोबर गप्पा मारल्याने चालकाचं रस्त्यावर लक्ष राहत नाही आणि अपघात होतात असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. दुचाकी चालवताना गप्पा मारल्यास लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतो असा युक्तीवाद करण्यात आला आहे. गप्पा मारताना लक्ष विचलित झाल्यास चालकाच्या हलचालींवर मर्यादा येतात आणि काही विपरित घडल्यास नेमका कसा प्रतिसाद द्यावा हे चालकाला समजत नाही. मागे बसलेल्या व्यक्तीला आपलं ऐकू जावं किंवा त्याचं म्हणणं ऐकू यावं म्हणून अनेकजण दुचाकी चालवतनाच डोकं किंवा मान वळवतात आणि त्यामुळे दुचाकी चालवतानाच योग्य पोझिशन बदलून संतुलन कमी होतं. यामुळेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पद्धतीने गाडी चालवल्याने भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही असं वाहतूक विभागाने म्हटलं आहे.


नक्की पाहा हा व्हिडीओ >> 'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही


किती दंड आकरणार?


गप्पा मारत दुचाकी न चालवण्याच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गांभीर्याने कारवाई करावी. नेमका किती दंड आकारला जाणार हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी हा दंड 500 रुपयांच्या आसपास असू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर नियमांप्रमाणे वारंवार हाच नियम मोडणाऱ्या चालकांकडून दुसऱ्यांदा पकडले गेल्यास अधिक दंड आकरला जाण्याची शक्यता आहे.