नवी दिल्ली : ट्रेनला होणारा उशीर आणि लागोपाठ प्रवाशांच्या येणा-या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढते. थंडीच्या दिवसात  तर धुक्यामुळे ट्रेनला होणा-या उशीराचा अंदाजही घेता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्दी झाल्याने स्टेशनवरही अडचण होते. पण आता या समस्येचं निरसन रेल्वेकडून केलं जाणार आहे. रेल्वे तुम्हाला गाडीचं लाईव्ह स्टेटस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर देणार आहे. ज्याद्वारे तुम्ही घरी बसल्या बसल्या गाडीचं लाईव्ह स्टेट्स बघू शकणार आहात. म्हणजे यापुढे गाडीची माहिती विचारण्यासाठी तुम्हाला आता १३९ नंबरवर फोन करण्याची गरज पडणार नाही. 


व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार लाईव्ह स्टेट्स


आत्तापर्यंत ट्रेनच्या लाईव्ह स्टेट्स जाणून घेण्यासाठी एकतर चौकशी कक्षात फोन लावावा लागत होता नाहीतर इंटरनेटवर पीएनआरच्या माध्यमातून माहिती घ्यावी लागत होती. पण वेबसाईट्सवर अनेकदा अपडेटेड माहिती नसते. अशात तुम्हाला आता त्रास करून घेण्याची गरज नाहीये. कारण तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून ट्रेनची ताजी माहिती माहिती मिळवता येईल. 


ट्रेन नंबर टाकल्यावर मिळणार माहिती


व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रेनची ताजी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ ट्रेनचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही वेळातच ट्रेनशी निगडीत माहिती तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या फोनवरून 7349389104 हा नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर तुम्ही त्या नावाने सेव्ह करावं लागेल, जेथून ट्रेन निघणार असेल. त्यानंतर कोणत्याही ट्रेनचा नंबर या नंबरवर पाठवून माहिती मिळवू शकता. 


एसएमएस सेवा


रेल्वेने राजधानी-शताब्दीसाठी एसएमएस सेवाही सुरू केली आहे. यानुसार राजधानी आणि शताब्दीच्या प्रवाशांसाठी मोबाईलवर एसएमएस पाठवून ट्रेन लेट होण्याची माहिती दिली जाते. ही सेवा याच महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे.