नवी दिल्ली : लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले व्हॉट्स अॅप हे सातत्याने नवनवे फीचर्स सादर करत आहे. अलीकडेच व्हॉट्स अॅप युजर्ससाठी डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर सादर केले होते. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज ७ मिनिटांच्या आत डिलीट केल्यास तो मेसेज पाठवणाऱ्यांपर्यंत पोहचणार नाही, असा दावा कंपनीने केला होता. त्याचबरोबर असेही सांगण्यात आले होते की, जोपर्यंत समोरची व्यक्ती तो मेसेज वाचत नाही तोपर्यत हे फीचर उपयुक्त ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र खूप कमी लोकांनी या फीचरचा लाभ घेतला असेल. मात्र एक प्रश्न उरतो तो म्हणजे डिलीट केलेलं मेसेज फोनमधून गायब होतात का ? मात्र नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार असे दिसून आले आहे की, डिलीट केलेले मेसेज डिव्हाईसवर राहतात आणि ते तुम्ही अगदी सहज वाचू शकता. यासंदर्भात स्पेनच्या ब्लॉग अॅनरॉईड जेफे यांनी दावा केला आहे की, डिलीट केलेले मेसेज हँडसेटच्या नोटिफिकेशन लॉगमध्ये उपलब्ध असतात. 


हे मेसेज बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर अॅनरॉईड नोटिफिकेशन लॉग मध्ये मेसेज सर्च करा.