मुंबई : व्हॉट्सऍप युझर्ससाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी. आता ऍनरॉईड युझर्स त्याचं स्टेटस अपडेट आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. व्हॉट्सऍप स्टेटस आता तुम्ही फेसबुकवर स्टोरी म्हणून शेअर करू शकतात. हे फिचर अगदी इंस्टाग्रामसारखं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याप्रमाणे इंस्टाग्रामवरील स्टोरी तुम्ही फेसबुकवर अगदी सहज शेअर करू शकतात. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॉट्सऍप स्टोरी देखील शेअर करता येणार आहे. याअगोदर, जून महिन्यात हे फिचर काही निवडक व्हॉट्सऍप युझर्सला तपासणीसाठी देण्यात आलं होतं. पण आता हे फिचर सर्व व्हॉट्सऍप  युझर्सकरता उपलब्ध होणार आहे. 


अशाप्रकारे करा व्हॉट्सऍप वरून फेसबुकवर स्टोरी अपडेट 


१. व्हॉट्सऍप  सुरू करू 'My Status' मध्ये जा 


२. हॅमबर्गर आयकॉनवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सऍप  स्टेटस फेसबुकवर शेअर करू शकता. 


३. यावेळी तुम्हाला एक पर्याय निवडता येईल तो म्हणजे 'Share to Facebook'


4. तुम्ही यावेळी फेसबुक प्रोफाईल पिक्चर देखील पाहू शकता. 


५.त्यानंतर 'Share Now' या पर्यायावर क्लिक करा. 
तुम्ही व्हॉट्सऍप वरून फेसबुकची स्टोरी बदलू शकता. यावेळी तुम्ही पब्लिक हे ऑपशन देखील निवडू शकतो. 


व्हॉट्सऍप प्रमाणेच फेसबुक स्टोरी देखील २४ तासांकरता राहू शकते. जरी तुम्ही व्हॉट्सऍप  स्टोरी डिलीट केली असली तरीही तुमची फेसबुक स्टोरी २४ तास राहणार आहे.