नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच यूट्यूबने 'यूट्यूब गो' या अॅपचे बीटा व्हर्जन सुरू केले. त्यामुळे इंटरनेट नसताना किंवा इंटरनेटचा वेग कमी असला तरी या अॅपवर व्हिडिओ पाहता येणार आहे. आता हे अॅप गुगल प्ले स्टोरवर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. 


काय आहेत सुविधा ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ सेव्ह करण्याची सुविधा आहे. त्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी कमी डेटा खर्च होईल.  व्हिडिओ ऑफलाईन पाहण्यापूर्वी त्याचा प्रिव्हयु पाहता येणार आहे. डाऊनलोड केलेले व्हिडिओ इंटरनल मेमरी किंवा एसडी कार्डमध्येही सेव्ह करता येतील. 


शेअरींगही उपलब्ध


त्याचबरोबर हे व्हिडिओज शेअरही करता येतील. ब्लूटूथ किंवा वाय-फाय द्वारे ते शेअर करता येतील.


अॅप कोठे आहे उपलब्ध ?


या अॅपची साइज १० एमबीपेक्षा कमी असून ते अँड्रॉइडवर ४.२ किटकॅट किंवा त्याहून अधिक असलेल्या व्हर्जनवर सुरू होते.