मुंबई : बँकेत पैसे जमा केल्यावर, पैसे काढल्यावर किंवा बँकेशी संबंधित इतर कुठलंही काम केल्यावर तुमच्या फोनवर तात्काळ SMS येतो. तुम्ही कुठल्याही प्रकारचा बँकिंग व्यवहार (Banking Transaction) केल्यावर बँकेतर्फे तुम्हाला एसएमएस पाठवण्यात येतो. मात्र, आता आणखीन एक आनंदाची बातमी आहे कारण, बँकेकडून येणारे हे एसएमएस आता थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणार आहेत. पाहूयात सविस्तर वृत्त...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, देशातील टॉप 5 बँका एका नव्या सेवेचं टेस्टिंग करत आहेत. त्या अंतर्गत ट्रान्झॅक्शन संबंधी मेसेजेस ग्राहकांना थेट त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवण्यात येणार आहेत.


यामुळे बँकेतुन पैसे काढल्यावर, जमा केल्यावर किंवा इतर बँकेचे व्यवहार केल्यावर ग्राहकांना SMS ऐवजी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँकेकडे रजिस्टर्ड फोन नंबर द्यावा लागणार आहे.


तुम्ही फोन नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर तुमच्या बँकिंग संबंधित व्यवहाराची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. यासोबतच बँकेतर्फ व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबरही सुरु केली जाऊ शकते. ज्याच्या माध्यमातून ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात.


सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, इंड्सइंड बँक आणि अॅक्सिस बँक ही सुविधा देण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहेत.