मुंबई : Vodafone Idea (VI) कमी किंमतीत सर्वोत्तम प्लान बाजारात आणला आहे. जर तुम्हाला KBC 2022 भारतात अतिशय परवडणाऱ्या कमी किमतीत पाहायचे असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरु शकतो. तुम्ही केवळ 82 रुपयांत आणि थेट तुमच्या स्मार्टफोनवर KBC 2022 एपिसोड पाहणे सुरू करू शकता. Vodafone Idea ग्राहकांसाठी 82 प्रीपेड प्लान ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे 28 दिवसांसाठी SonyLIV चे सदस्यत्व मिळवू शकतात. जाणून घ्या Vodafone Idea ची ही ऑफर.


KBC 2022 पाहण्यासाठी Vodafone Idea प्रीपेड प्लान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला KBC 2022 फक्त 82 रुपयांमध्ये बघायचा असेल तर Vi चा 82 रुपयांचा प्रीपेड प्लान खरेदी करा. हे एक डेटा व्हाउचर आहे, म्हणजेच तुम्हाला  82 रुपयांचा प्लान अ‍ॅक्टीव्ह करण्यासाठी बेस अ‍ॅक्टिव्ह प्रीपेड प्लानची ​​आवश्यकता असेल. 82 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना 14 दिवसांसाठी 4GB डेटा मिळतो. पण SonyLIV चे सबस्क्रिप्शन 28 दिवसांसाठी दिले जात आहे. Vodafone Idea वापरकर्त्यांना अत्यंत नाममात्र किमतीत KBC 2022 पाहण्याची सुविधा देत आहे. तुम्ही फक्त मोबाईलवर SonyLIV पाहू शकता. मात्र, टीव्हीवर पाहण्याची सोय नाही.


SonyLIV चे सदस्यत्व 28 दिवसांसाठी उपलब्ध  


एकदा सक्रिय झाल्यानंतर, Sony LIV सदस्यता रद्द किंवा निष्क्रिय केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही Sony LIV सबस्क्रिप्शन सक्रिय करताच, तुम्हाला ते थेट 28 दिवसांसाठी मिळेल. याचा फायदा असा की तुम्ही फक्त केबीसी पाहण्यापुरते मर्यादित नाही, तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर इतरही अनेक शो आणि चित्रपट पाहू शकता. अनेक Sony LIV Originals आहेत जे भारतीय लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.


Sony LIV योजना


Sony LIV सबस्क्रिप्शन मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तो स्वतंत्र खरेदी करणे. एका वर्षासाठी Sony LIV प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला 999 रुपये आणि फक्त मोबाईल प्लान एक वर्षासाठी 599 रुपयांत उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला KBC चा हा सीझन पाहायचा असेल, तर हे Vodafone Idea व्हाउचर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो कारण ते खूप फायदेशील आहे.