मुंबई : जपानची दुपहिया वाहन निर्माता कंपनी ओकिनावा (Okinawa) या टू व्हीलर्सने नवीन स्कूटर लाँच केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही स्कूटर भारतीय बाजारात धमाका उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. ही जपान कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवत असून या अगोदर कंपनीने मार्केटमध्ये 2016 मध्ये इलेक्ट्रिक स्कूल रिजला आणलं होतं. आता लाँछ करण्यात आलेल्या प्रेजला रिजपेक्षा जास्त चांगल म्हणजे उत्तम वर्जनमध्ये लाँच केलं आहे. भारतात वाढत असलेल्या प्रदूषणामुळे ओकिनावासगळ्या फास्ट इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बनली आहे. 


प्रेज ओकिनावा ही हायस्पीड स्कूटर आहे. याचे दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत ही 58,889 रुपये इतकी आहे. जाणून घ्या या स्कूटरचे फीचर्स आणि इतर स्पेशिफिकेशन



ओकिनावाच्या प्रेजमध्ये 1000 वॅटची दमदार मोटर आहे. ही मोटर 3.35 बीएचपी पॉवर निर्माण करते. फूल चार्ज केल्यानंतर ही एकावेळी 175 ते 200 किमी दूर जाण्याची क्षमता ठेवते. कंपनीचा असा दावा आहे की, रस्त्यावर ही 75 किमी प्रती कास प्रवास करेल. या प्रेजला फूल चार्ज करण्यासाठी 2 तासाचा कालावधी लागतो. या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनरोड किंमत ही 66,000 रुपये इतकी असणार आहे. 


एक किमीचा खर्च 


कंपनीच्या माहितीनुसार या प्रेजला एक किमी चालण्याचा खर्च हा 10 पैसे इतका आहे. जर तुम्ही 10 किमी चा प्रवास करता तर तुम्हाला यासाठी फक्त 1 रुपये खर्च आहे. इतर पेट्रोलने चालणाऱ्या टू - व्हिलरचा खर्च हा 15 रुपये इतका आहे. त्यामुळे प्रेज ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय फायदेशीर आहे. स्टायलिश लूकच्या या स्कूटरमध्ये दोन्हीकडे डिस्क ब्रेक आहे. 


डिटॅचेबल बॅटरी 


आतापर्यंत बाजारात आलेल्या सर्व इलेक्ट्रिक टू- व्हीलरमध्ये सर्वात मोठी समस्या आहे त्याची चार्जिंग. मात्र कंपनीने प्रेजमध्ये या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेजमध्ये ओकिनावाने डिटॅचेबल बॅटरी दिली आहे. या बॅटरीला घेऊन तुम्ही कुठेही चार्ज करू शकता. म्हणजे जर तुम्ही तिसऱ्या माळ्यावर राहत असाल तर तुम्ही तुमच्या घरी या स्कूटरची बॅटरी चार्ज करू शकता. 



सेफ्टी फिचर 


ओकिनावाने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सेफ्टीचा खास विचार केला आहे. 12 इंचाच्या व्हीलसोबत प्रेजच्या फ्रंटमध्ये ट्विन डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. तसेच रियरमध्ये देखील सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. हे डिस्क ब्रेक 75 किमी प्रति तासाच्या स्पिडने सहज अंतर कापतो. ही स्कूटर तुम्ही अवघ्या 2 हजारात बुकिंग करू शकता. 


एलइडी हँडलॅप 


रात्री प्रवासात काही अडचण येऊ नये म्हणून स्कूटरने डेटाइम रनिंग लाइटचे एलइडी हँडलॅप लावले आहे. सोबतच एलइडी टेललाइट आणि इंडिकेटर याच्या लूकला अधिक खास बनवले आहे. या महिन्याच्या अखेरीस ही बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. कंपनी या स्कूटरला 106 डिलरशिपच्या माध्यमातून विकणार आहे. कंपनी 2018 मध्ये 150 डिलरशीप आणि 2020 पर्यंत देशात 500 आऊटलेट बनवणार आहे.