OLA Electric लवकरच बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची योजना आखत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये उतरल्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची घोषणाही केली होती. त्यानंतर OLA Electric Car संबंधी गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज लावले जात आहेत. त्यातच या कारचा पहिला फोटो समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कारची पेटंट इमेज सोशल मीडियावर लीक झाली आहे. यामध्ये कारचा लूक आणि डिझाइन आकर्षक दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओला इलेक्ट्रिक कारचा जो फोटो समोर आला आहे, तो पाहून ही आता कॉन्सेप्ट स्टेजवर असल्याचं दिसत आहे. ही अद्याप पूर्णपणे प्रोडक्शनसाठी तयार गाडी नाही. दरम्यान, कंपनीने कारची घोषणा केल्यानंतर एक टिझरही जारी केला होता. यामध्ये लाल रंगाच्या OLA कारची बैजिंग आणि शार्प लाइन्स दाखवण्यात आल्या होत्या. पण पेटंट इमेज त्यापेक्षा एकदम वेगळी दिसत आहे. 


नव्या इमेजच्या आधारे बोलायचं गेल्यास ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करुन देतो. ही एक पारंपारिक सेडान सिल्हूट आहे, ज्याच्या मागील बाजूला एक कूपसारखी छत मिळते. बॉडी पॅनल्सना स्मूथ बनवण्यासहितच एअरोडायनामिकासाठी सर्वोत्तम बनवण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारची मागील चाकांचं अंतर जास्त ठेवण्यात आलं आहे. जे कारचा व्हीलबेस वाढवतील. कंपनी बॅटरी पॅकसाठी याचा फायदा उचलेल असा अंदाज आहे. 



पारंपारिक इलेक्ट्रिक कारप्रमाणे यामध्ये कोणताही फ्रंट ग्रिल देण्यात आलेला नाही. हेडलॅम्प असेंबली बम्परच्या वरती आहे आणि त्यात हिरोजँटल लॅपचा समावेश आहे. जी एका एलईडी लाइटसह सादर करण्यात आली आहे. LED लाइट दोन्ही हेडलाइट्सपर्यंत पोहोचत असून संपूर्ण बोनेट कव्हर करत आहे. या कारमध्ये ड्युअल-टोर रुफ देण्यात येणार आहे. गेल्यावेळी कंपनीने टिझरमध्ये ग्लॉस रुफ दाखवला होता. कारच्या मागील बाजूसंबंधी अधिक माहिती समोर आलेली नाही. 


ड्रायव्हिंग रेंजसंबंधी रिपोर्ट काय आहे?


ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक कारशी संबंधित तंत्रज्ञान अद्याप मर्यादित आहे. पण यामध्ये 500 किमीपेक्षा अधिक रेंजसह 70-80kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. OLA ने आधीही सांगितलं होतं की, कंपनीचं लक्ष्य इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0 ते 100 किमी ताशी किमी वेग पकडण्यास सक्षम असावी असा प्रयत्न आहे. ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार असेल. पुढील वर्षापर्यंत ही कार बाजारात आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.