Car Engine Care Tips: आपल्या वाहनाची आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतो. गाडीला जरासा जरी क्रॅश गेला तर जिव्हारी लागते. त्यामुळे गाडी व्यवस्थित असावी, असा अट्टाहास असतो. गाडी व्यवस्थित राहावी यासाठी आपण गाडीची साफसफाई करतो. पण असं असलं तरी गाडी फक्त वरून सुंदर दिसून चालत नाही. तर गाडीच्या इंजिनची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत काही खास टिप्स सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्ही तुमच्या गाडीचं इंजिन व्यवस्थित ठेवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्टर बदला: आपल्या गाडीतील एअर आणि ऑइल फिल्टर वेळेवर बदलणं गरजेचं आहे. यामुळे इंजिनला चिकटपणा येणार नाही. तसेच प्रत्येक महिन्याला ऑईल लेव्हलची तपासणी करा. जर लेव्हल कमी झाली असेल तर ऑईल टाकून घ्या. त्याचबरोबर ऑईल फिल्टरही तितकंच महत्त्वाचा आहे. यामुळे इंजिन जास्त गरम होत नाही. 


कूलिंग सिस्टमची तपासणी करा: कारमध्ये कूलेंटची लेव्हल व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यामुळे इंजिनचा तापमान मेन्टेन राहतं. जर तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी जायचं असेल तर बोनट खोलून एक कूलेंट चेक करा. कमी झालं असेल तर रिफील करा. जर एकदमच अर्जंट असेल तर पाणीही टाकू शकता. 


ऑईल लीकेजची तपासणी: गाडी जुनी झाली असेल तर ऑईल लीकेजची समस्या असते. अशी स्थिती तुमच्या गाडीत असेल तर दुर्लक्ष करू नका. त्यामुळे भविष्यात इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. तात्काळ मॅकेनिकला बोलवून लीकेज दुरूस्त करून घ्या. 


क्लच आणि ब्रेक: काही जणांना गाडी चालवताना क्लचवर पाय ठेवण्याची सवय असते. यामुळे क्लच प्लेट खराब होऊ शकते. तसेच इंजिनवर प्रेशर येतं. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर अशी चूक करू नका. 


कार सर्व्हिस: आपल्या गाडीची सर्व्हिसिंग काही महिन्यांच्या अंतराने करा. सर्व्हिंसिंग करण्यास टाळाटाळ केली तर इंजिनचं नुकसान होऊ शकते. दुसरीकडे तुमची गाडी दारात बऱ्याच दिवसांपासून उभी असेल, तर रोज गाडी थोडी थोडी चालवण्याचा प्रयत्न करा.