मुंबई : वनप्लसने लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये 'वनप्लस 6' लॉन्च केला आहे. वनप्लसने आता सर्वांना आश्चर्याचा धक्का देत वायरलेस हेडफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा हेडफोन वनप्लस बुलेट वायरलेस हेडफोन नावाने बाजारात आणला आहे. दहा मिनिटाच्या चार्जनंतर हा ५ तास बॅटरी बॅकअप देतो, हा हेडफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हेडफोन ५ जून रोजी विक्रीसाठी येणार आहे. कंपनीने या हेडफोनची किंमत ४ हजार ६४७ रूपये ठेवली आहे. 


तसेच त्याला मॅगनेटीक क्लॅपद्वारा चालू बंद करणे सोपं आहे. मॅग्नेटिक एंडला चिटकवल्यावर हा हेडफोन ऑटोमॅटीक ऑफ होतो, आणि बाजूला केल्यावर ऑन होतो. हा इअर फोन स्वॅट रेझिस्टंट आणि रेन रेझिस्टंट देखील आहे. मॅग्नॅटिक क्लिप बाजूला केल्यानंतर तुम्ही कॉल देखील घेऊ शकतात. हा हेडफोन  AptX कोडकचा सपोर्ट करतो. वनप्लसने ऑडिओ डिस्ट्रॉशन कमी करण्यासाठी, एनर्जी ट्यूबवर काम केलं आहे.