OnePlus 10T 5G Specifications before Launch: अँड्राईड स्मार्टफोन निर्मात कंपनी वनप्लस नवा 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन OnePlus Ace Pro नावाने ओळखला जातो. या स्मार्टफोनमधील बॅटरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इतर स्मार्टफोनपेक्षा या स्मार्टफोनची बॅटरी जबरदस्त असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर इतर फीचर्सदेखील मोबाईलप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हा स्मार्टफोन कधी लाँच होणार आहे? यात काय फीचर्स आहेत आणि स्मार्टफोनची किंमत किती असू शकते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OnePlus 10T 5G स्मार्ट ऑगस्ट महिन्यात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच केला जाणार आहे. अर्थात भारतातही तेव्हापासून उपलब्ध असणार आहे. OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन 3 ऑगस्ट 2022 रोजी सादर केला जाईल. भारतात अॅमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो. OnePlus 10T 5G या स्मार्टफोनच्या किमतीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्स झालेल्या माहितीनुसार OnePlus 10T 5G Pro स्वस्त असून त्याची किंमत 66,999 रुपये इतकी आहे. तर बेस व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये असेल. 


OnePlus 10T 5G चे डिस्प्ले स्पेसिफिकेशन देखील कंपनीने टीझ केले आहेत. यामध्ये 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 720Hz टच सॅम्पलिंग रेट, HDR10 + सपोर्ट आणि 20:9 आस्पेक्ट रेशो मिळेल. या फोनमधील बेजेल्स खूप पातळ असतील आणि त्यांची रुंदी फक्त 1.48mm असेल. OnePlus 10T 5G मध्ये 150 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला. यापूर्वी इतर स्मार्टफोन इतका वॅट चार्जिंग सपोर्ट दिला गेलेला नाही. त्यामुळे या स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत चर्चा आहे. या स्मार्टफोनमध्ये 4800mah बॅटरी आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसरवर काम करेल आणि यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 16GB रॅम दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 256GB स्टोरेज व्हेरियंटसह बाजारात येऊ शकतो. चीनमध्ये या फोनमध्ये 512GB स्टोरेज दिले जाऊ शकतो. OnePlus 10T 5G मध्ये आठ-चॅनल वेपर चेंबर आहे जो फोनला थंड ठेवेल आणि गरम होऊ देणार नाही.  हा 5G स्मार्टफोन Android 12-आधारित ColorOS 12.1 वर चालेल.


कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus Ace Pro ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 50MP Sony IMX766 प्राइमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. OnePlus 10T 5G मध्ये व्हिडीओ कॉल करण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.