Oneplus 11 5g Price In India: 'वनप्लस'ने अखेर आपला नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने OnePlus 11 ला अधिकृतपणे लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असलेला स्मार्टफोन आहे. कंपनीने स्मार्टफोनची किंमत कमी ठेवत सॅमसंग आणि 'आयक्यूओओ'सारख्या ब्रॅण्ड्सला थेट आव्हान दिलं आहे.


या फोनला देणार टक्कर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंग गॅलेक्सी एस22 सीरीजची किंमत 79 हजार 999 रुपयांपासून सुरु होते. तर 'आयक्यूओओ' 11 हा फोन 59 हजार 999 ला उपलब्ध आहे. OnePlus ने आपल्या फ्लॅगशीप फोनची किंमत या दोन्ही फोनपेक्षा कमी ठेवली आहे. तसेच कंपनीने OnePlus 11R हे व्हर्जनही लॉन्च केलं आहे. याचे फिचर्स जाणून घेऊयात...


OnePlus 11 5G ची किंमत


वनप्लसचा हा फोन 56 हजार 999 रुपयांपासून उपलब्ध आहे. याच बेस प्राइजला हा फोन कंपनीने लॉन्च केला आहे. या किंमत फोनचं 8 GB RAM + 128 GB स्टोरेजचं व्हेरिएंट उपलब्ध आहे. टॉप व्हेरिएंट म्हणजेच 16 GB RAM + 256 GB स्टोरेज असलेला फोन 61 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.


स्पेसिफिकेशन्स काय?


OnePlus या फोनमध्ये दोन ऑप्शन दिले आहेत. यामध्ये इटरनल ग्रीन आणि टायटन ब्लॅक हे दोन रंग उभपलब्ध आहेत. अॅमेझॉन आणि वनप्लसच्या वेबसाईटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. OnePlus 11 5G मध्ये प्रिमियम स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. हॅण्डसेटमध्ये 6.7 इंचाचा 2K Super Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 16 GB RAM सहीत उपलब्ध आहे. यात 256 GB चा पर्यायही उपलब्ध आहे.


दमदार कॅमेरा


हॅण्डसेट Android 13 वर आधारित Oxygen OS 13 वर काम करतो. फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची मुख्य लेन्स 50 मेगापिक्सलची आहे. त्याशिवाय 48 मेकापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स यात देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सचा असून हा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.


OnePlus 11 R मध्ये खास काय?


दोन्ही फोनचा लूक सारखाच आहे. यामध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल असा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रण्टला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.