भारतात OnePlus 6 स्मार्टफोन लॉन्च, पाहा, फीचर्स आणि किंमत
चीनी कंपनी भारतात आपला स्मार्टफोन OnePlus-6 लॉन्च केला आहे.
मुंबई : चीनी कंपनी भारतात आपला स्मार्टफोन OnePlus-6 लॉन्च केला आहे. OnePlus स्मार्टफोन Amazon आणि पॉप-अप स्टोअर्ससह 8 शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत भारतात ३४ हजार ९९९ रूपये आहे, वेरिएंट कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. OnePlus 6 मध्ये 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज, किंमत 34 हजार 999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम /128 जीबी स्टोरेज वेरियंट 39 हजार 999 रुपये आहे.तर दुसरीकडे वनप्लस 6 मार्वल अॅवेंजर्स लिमिटेड एडिशनचा अॅमेझॉन आणि वनप्लडॉटइन वर ओपन सेलमध्ये 29 मे रोजी विकला जाईल.
या व्हेरियंटची किंमत 44 हजार 999 रुपये आहे, 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज असलेला सिल्क व्हाईट व्हेरियंट ५ जूनपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.या स्मार्टफोनसाठी OnePlus 6 चा कॅमेरा अल्ट्रा स्लो मोशन फीचर सोबत आला आहे. 480 फ्रेम्स प्रती सेकंद फोटो खेचणारा OnePlus 6 हा एकमेव फोन आहे.
जो एका मिनिटापर्यंत अल्ट्रा स्लो मोशन खेचण्यासाठी सक्षम आहे. OnePlus 6 मध्ये फास्ट चार्ज सपोर्टसाठी 3,300 mAh बॅटरी आहे. याशिवाय यासोबत मिरर ब्लॅक, मि़डनाईट ब्लॅक आणि सिल्क व्हाईटचे ३ कलर व्हेरिएंट आहेत.