मुंबई : OnePlus 6 च्या लॉन्चिंगची तारीख जवळ आली आहे. यापूर्वी त्याच्या फिचर्सबद्दलच्या अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. OnePlus चे एक्सक्लूझिव्ह ऑनलाईन पार्टनर अॅमेझॉन इंडियाने २२ एप्रिलच्या रात्री १२ वाजता रजिस्ट्रेशन पेज ओपन केले आहे. द नोटिफाय मी पेज लोकांना कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये इंटरेस्ट दाखवण्यासाठी आणि प्रॉडक्टचे रजिस्ट्रेशन घेण्यासाठी सवलत देत आहे. OnePlus च्या नव्या फोनसाठी तुम्ही जास्त वाट पाहु शकणार नसाल तर कंपनीने त्यासाठी एक खास पर्याय दिला आहे. कंपनीच्या एका ऑफर अंतर्गत हा फोन लॉन्च होण्यापूर्वी तुम्हाला फ्रि मध्ये मिळेल. लॉन्चिंगपूर्वी कंपनी हा फोन काही लोकांना देत आहे. 


यासाठी फ्रि मिळेल फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनचे अधिकतर फिचर्स लीक झाले आहेत. फोनची किंमत आणि हा फोन केव्हापासून मिळण्यास सुरुवात होईल याची तारीख समोर आली आहे. OnePlus आपल्या नव्या स्मार्टफोन OnePlus6 चे रिव्हूसाठी काही लोकांना हा फोन देण्यात येणार आहे. त्यामुळे फोनचा परफॉर्मंन्स आणि दुसऱ्या फोनपेक्षा किती दमदार आहे, हे समजेल.



त्यासाठी हे करा


OnePlus ने द लॅब नावाचा प्रोग्रॅम सुरु केला आहे. त्यामध्ये रिव्हू लिहिण्यासाठी लोकांना फोन देण्यात येईल. तुम्हालाही हा फोन हवा असल्यास द लॅबमध्ये रजिस्ट्रेशन करा आणि एक अर्ज इंग्रजीत भरायला हवा. ३ मे पर्यंत तुम्ही हे अॅप्लिकेशन भरु शकता. 



फोनचे फिचर्स


OnePlus 6 मध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रेगन 845 प्रोसेसर असेल आणि हा फोन ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅमच्या वेरिएंटवर मिळेल. त्याचबरोबर या फोनमध्ये २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. याशिवाय फोनमध्ये अॅनरॉईड ओरिओ ८.१, ६.२८ इंचाची फुल  HD+ एमोलेड डिस्प्ले मिळेल. याची डिजाईन iPhone X प्रमाणे असेल आणि यात फेस अनलॉकचे फिचरही असेल. हेडफोन जॅक देखील असेल. वनप्लस ६ ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक रंगाच्या वेरिएंटमध्ये मिळेल. फोनमध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात २० मेगापिक्सलचा एक आणि १६ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा असेल. त्याचबरोबर २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. यात 350mAh ची बॅटरी असेल.