मुंबई : वन प्लस लवकरच नववी सीरीज लाँच करणार आहे. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सीरीजचं पोस्टरही कंपनीने ट्विटरवरून शेअर केलं आहे. २३ मार्चला या दोन्ही फोनचं लाँचिंग होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फोन कोणकोणत्या रंगात येतील, याचीही माहिती देण्यात आली आहे. वनप्लस ९ हा विंटर मिस्ट रंगात, तर वनप्लस प्रो हा मॉर्निंग मिस्ट या रंगामध्ये उपलब्ध असेल. वनप्लस ९ मध्ये ३ कॅमेरा असतील, तर वनप्लस ९ प्रोमध्ये ४ कॅमेरा असणार आहेत.



 


IANS या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार वनप्लस ९ सीरीज 65W चार्जिंग सपोर्ट असणार आहे. OnePlus 9 Lite मध्ये बऱ्यापैकी  OnePlus 8T चे फिचर असतील. वनप्लस ९ मध्ये ८ जीबी रॅम, १२८जीबी स्टोरेज स्पेस असेल. या सीरीजमध्ये Android 11 OS वर्जन असेल.



याआधीह जाहीर केलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये कंपनीने सांगितलेलं की, OnePlus 9 series मध्ये १४० डिग्री व्यू कव्हर करू शकणारा पॅनोरॅमिक कॅमेराही असेल. कॅमेरासाठीही अडव्हान्स्ड लेन्स असतील.