OnePlus Nord आणि Samsung M31S चा अॅमेझॉनवर सेल, या दिवसांपासून करा बुकिंग
अॅमेझॉनवर खास सेल सुरु करण्यात आला आहे. कोरोना संकटानंतर हा पहिलाच मोठा सेल आहे. या सेलमध्ये मोबाईल घेणाऱ्यांसाठी खास ऑफर आहे.
मुंबई : अॅमेझॉनवर खास सेल सुरु करण्यात आला आहे. कोरोना संकटानंतर हा पहिलाच मोठा सेल आहे. या सेलमध्ये मोबाईल घेणाऱ्यांसाठी खास ऑफर आहे. OnePlus चा OnePlus Nord हा जबरदस्त मोबाईल ४ ऑगस्टपासून विक्रीला उपलब्ध आहे. तर सॅमसंगचा Samsung M31S या मोबाईलवर ऑफर आहे. हा फोन ६ आणि ८ रॅमचा असून इनबिल्ट स्टोरेज क्षमता १२८ जीबी असून याची किंमत १९४९९ तर ८ रॅमच्या मोबाईची किंमत २१४९९ आहे. या मोबाईलचा सेल ६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
OnePlus ने आपला सर्वात स्वस्त फोन OnePlus Nord बाजारात आणला आहे. वनप्लस नॉर्डला कंपनीने प्रीमियम फीचर्स सोबत मिड रेंजमध्ये उतरवले आहे. वनप्लस नॉर्ड मध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेजचे फीचर्स देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. सॅमसंगने Samsung M31S या मोबाईलला दोन दिवसानंतर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. त्यामुळे या दोन फोनबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वनप्लस नॉर्ड च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२९ जीबी स्टोरेज व्हेरियंट २७ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओपन सेलमध्ये केवळ ८ जीबी रॅम व १२ जीबी रॅम व्हेरियंट उपलब्ध होणार आहे.
ओपन सेल अंतर्गत कंपनी आपल्या फोनवर काही जबरदस्त ऑफर देत आहे. सर्व मोठ्या बॅंकाच्या कार्डवर ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय वर फोन खरेदी केला जावू शकतो.
दरम्यान, OnePlus Nord चा ६ जीबी रॅम व्हेरियंटला या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तिन्ही व्हेरियंट्सला ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनिक्स कलर मध्ये लाँच करण्यात येणार आहे.