मुंबई : OnePlus Nord Watch लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतं. या आगामी घड्याळाबाबत अनेक लीक्स समोर आलं आहेत. नवीन लीकमध्ये त्याचे 5 वेगवेगळे रेंडर्स उघड झाले आहेत. या रेंडर्समध्ये, OnePlus चे आगामी Nord Watch पाच वेगवेगळ्या बाजूंनी पाहिलं जाऊ शकतं. त्याचा लूक आणि डिझाईन अगदी OnePlus Watch प्रमाणे आहे. असं असलं तरी त्याची किंमत वनप्लस वॉचपेक्षा कमी असू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी वनप्लस नॉर्ड वॉच भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर दिसला होता. BIS ची यादीनुसार, ही वॉच लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल. टिपस्टर मुकुल शर्माने या आगामी घड्याळाचे रेंडर शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या डिस्प्ले आणि डिझाइनबद्दल डिटेल्स उपलब्ध आहेत.


OnePlus Nord Watch



घड्याळाचा गोलाकार डायल पहिल्या रेंडरमध्ये दिसू शकतो. या स्मार्टवॉचच्या उजव्या बाजूला दोन बटणे आणि डिस्प्लेवर डॅश लाइन डिझाइन देण्यात आलं आहे. प्रोटेक्टिव्ह एज देखील यामध्ये आढळू शकतं. या रेंडरमध्ये देखील बाजूला दोन बटणे दिसू शकतात, पण डिस्प्लेवर संरक्षणात्मक किनार आणि डॅश लाइन दिलेली नाहीत.


नॉर्ड वॉचची रचना वनप्लस स्मार्टवॉच सारखीच आहे. त्याच्या बाजूला एकच बटण दिसू शकतं. गोलाकार डायलसह घड्याळाच्या उजव्या बाजूला एक काळ्या रंगाचे सिंगल क्राउन बटण देखील दिसत आहे. याशिवाय टिपस्टरने OnePlus Nord Watch मध्ये वापरलेला यूजर इंटरफेस देखील शेअर केला आहे.


OnePlus Watch



याआधी भारतात लॉन्च झालेल्या OnePlus Watch ची किंमत 14,999 रुपये आहे. तुम्ही ते मिडनाईट ब्लॅक आणि मिडनाईट सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. हे SpO2 आणि हार्ट रेड मॉनिटरिंग हेल्थ फीचर्ससोबत येतं. यामध्ये 110 हून अधिक व्यायाम पद्धती देण्यात आल्या आहेत. हे स्मार्टवॉच वार्प फास्ट चार्जिंगसह येतं.