OnePlus Community Sale : वनप्लस युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. चीनी टेक कंपनी वनप्लस भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उत्पादनांची विक्री करत आहे. कंपनी प्रीमियम अनुभवासह उत्तम अशी उपकरणे विकते ज्यासाठी प्रीमियम किंमत देखील मोजावी लागते. त्यामुळे कंपनीने कम्युनिटी सेल आणला आहे. या जबरदस्त सेलमध्ये स्मार्टफोनच्या प्रत्येक रेंजवर बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्ट टीव्हीवरही आकर्षक डील्स उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर या कम्युनिटी सेलमध्ये इअरबड्स आणि स्मार्टवॉच सारख्या उत्पादनांवर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेलच्या माध्यमातून वनप्लस नॉर्ड वॉच अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. बऱ्याच काळानंतर हे घड्याळ इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध झाली आहे. 11 जूनपर्यंत चालणाऱ्या या सेलदरम्यान कंपनीच्या स्मार्टवॉचवर फ्लॅट डिस्काउंट देखील वाढवण्यात आला आहे. या सेलमुळे ग्राहक सुमारे 7000 रुपयांचे OnePlus Nord Watch 3,500 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकणार आहे. या किमतीत असे घड्याळ मिळणे हा युजर्ससाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे.


OnePlus Nord Watch ची भारतीय बाजारात किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  Amazon वर हे स्मार्ट वॉच 4,499 मध्ये विक्रीसाठी आहे. पण कंपनीच्या वेबसाइटवर ते फक्त 3,999 मध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त सवलतीसह मिळणार आहे. त्यामुळे कंपनीच्या वेबसाइटवरूनच ऑर्डर करण्याबाबत नक्कीच विचार करा. यासोबत ICICI बँक क्रेडिट कार्ड, EMI किंवा ICICI नेटबँकिंगद्वारे खरेदी करणाऱ्यांसाठी 500 रुपयांची सूट ऑफर देखील देण्यात आली आहे. त्यामुळे घड्याळाची किंमत 3,499 रुपयांपर्यंत खाली येणार आहे हे स्मार्टवॉच मिडनाईट ब्लॅक आणि डीप ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.


स्मार्टवॉचमध्ये फिचर्स काय आहेत?


OnePlus Nord Watch us प्रीमियम मेटल बिल्ड फिनिशसह येते आणि त्यात सिलिकॉन पट्टे आहेत, जे बदलले जाऊ शकतात. यात 1.78-इंच 60Hz AMOLED डिस्प्ले आहे आणि नेहमी-ऑन-डिस्प्ले सपोर्ट उपलब्ध आहे. घड्याळात 105 फिटनेस मोड आहेत आणि हृदयाची गती, ऑक्सिजन पातळी, फिटनेस मॉनिटरिंग आणि स्लीप ट्रॅकिंग उपलब्ध आहे.


स्मार्ट टीव्हीवरसुद्धा सूट 


वनप्लसच्या प्रीमियम रेंजच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 99,999 रुपये आहे. ग्राहक 5000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत हा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतील. याशिवाय, OnePlus TV 50 U1S, OnePlus TV 55 U1S आणि OnePlus TV 65 U1S या सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 2000 ते 4000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासोबतच या टीव्हीवर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.